एक्स्प्लोर

Eknath Khadse : मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणीत पुन्हा वाढ, जळगावच्या सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Jalgaon News : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khads) यांच्यावर रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशनमध्ये (Savda Police Station) गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Jalgaon News : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khads) यांच्यावर रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशनमध्ये (Savda Police Station) गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांसोबत केलेल्या अर्वाच्य शब्दात अरेरावी व गृहमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप एकनाथ खडसेंवर पोलीस फिर्यादीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्वतः पोलिसांनीच हा गुन्हा दाखल केला आहे. मात्र एकनाथ खडसेंनी आरोपाचे खंडन करत गौण खनिज प्रकरणात गुन्हा दाखल का करण्यात आला नाही? याबाबत माहिती घेण्यासाठी सावदा पोलीस स्टेशनला गेलो होतो व त्यावेळी पोलीस निरीक्षकांबाबत चुकीने एक शब्द निघाल्याने त्यांची माफी ही आपण मागितल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात एकनाथ खडसेंवर नेमकी काय कारवाई होणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Jalgaon Crime News : अश्लील भाषेत मोठमोठ्याने शिवीगाळ, धमकी अन् दमदाटी

दरम्यान, या प्रकरणात सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. विधानपरीषद सदस्य एकनाथराव गणपतराव खडसे रा. मुक्ताईनगर हे सावदा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये दाखल झाले, त्यानंतर त्यांनी तासखेडा ता. रावेर येथील गौणखनिज संदर्भात गुन्हा दाखल का केला नाही ? अशी आमच्याकडे विचारणा केली.  त्यानंतर ते आम्हाला अत्यंत अपमानास्पद बोलले, तसेच आमच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप लावतो, अशी धमकी देखील त्यांनी यावेळी दिली, आम्हाला दमदाटी देखील केली, असं या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्र शासनाचे मंत्री यांना अश्लील भाषेत मोठमोठ्याने शिवीगाळ केली, असा आरोप देखील यावेळी खडसेंविरोधात करण्यात आला आहे, या प्रकरणात आता खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.

Eknath Khadse : माझ्याकडून काही चुकीचे शब्द बोलले गेले, त्याबद्दल मी माफी मागितलीय

दरम्यान, माझ्यावर जो गुन्हा दाखल केला आहे तर तो करू द्या, मी कायदेशीर लढेल. सावदा पोलीस स्टेशनला अवैध उत्खनन झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती, तरी पोलीस कारवाई करत नव्हते, आणि मी या संदर्भात अधिवेशनात देखील जाब विचारला होता. माझ्याकडून काही चुकीचे शब्द बोलले गेले, त्याबद्दल मी माफी मागितली आहे, असंही यावेळी खडसे यांनी म्हटलं आहे.

ही बातमीही वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Devendra Fadnavis: टॅरिफ वॉर झालं तेव्हा भारत झुकला नाही, कणखरपणे उभा राहिल्याने अमेरिकालाही मागे हटावं लागलं: देवेंद्र फडणवीस
टॅरिफ वॉर झालं तेव्हा भारत झुकला नाही, कणखरपणे उभा राहिल्याने अमेरिकालाही मागे हटावं लागलं: देवेंद्र फडणवीस
Harshvardhan Sapkal on PM Narendra Modi: आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
MNS Vardhapan Din 2026 : रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...
रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Govinda Denies Cheating Rumours With Wife Sunita Ahuja: गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Embed widget