एक्स्प्लोर

Sharad Pawar : शरद पवारांचा नातवासोबत फोटो, मोठे पवार पुन्हा कुटुंबासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत

Ajit Pawar Death : शरद पवार हे पार्थ पवार यांच्याशी चर्चा करत असताना त्या ठिकाणी रोहित पवार आल्याचं दिसून आलं. त्यानंतर शरद पवारांनी दोघा नातवांशी चर्चा केली. 

मुंबई : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेवरून दोन्ही पक्षात असणारी मतभिन्नता गेल्या काही दिवसांत समोर येत आहे. मात्र त्याचवेळी पवार कुटुंबीयांमध्ये असणारे नात्याचे बंध मात्र आजही तितकेच घट्ट असल्याचं चित्र दिसतंय. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या बारामतीतल्या सहयोग सोसायटीत सांत्वनासाठी येणाऱ्यांची रिघ लागल्याचं दिसून आलं. इथं अजित पवारांच्या कुटुंबीयांसोबत स्वतः शरद पवारही सातत्यानं हजर असल्याचं दिसतं. याच सहयोग सोसायटीतला पार्थ पवार आणि शरद पवारांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चेला नवा विषय मिळाला

आजोबा आणि नातू एकमेकांशी चर्चा करताना फोटो सध्या राजकीय वर्तुळात शेअर होत आहे. वडिलांच्या अकाली निधनाचं दुःख पचवणारे पार्थ पवार आणि पुतण्याच्या अपघाती निधनानं बसलेला धक्का सावरणारे शरद पवार दोघंही गेले काही दिवस सातत्यानं बारामतीच्या सहयोग सोसायटीत बसून असतात. अजितदादांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दररोज शेकडो लोकांची पावलं या सहयोग सोसायटीकडं वळतात. त्यांना भेटण्यासाठी अजितदादांच्या कुटुंबीयांसोबत स्वतः शरद पवारही हजर असतात. 

शरद पवार-पार्थ पवारांमध्ये चर्चा

याच दरम्यान टिपलेला हा फोटो. पार्थ पवारांसोबत चर्चा करत असताना तिथं रोहित पवारही आले आणि त्यानंतर दोन्ही नातवांसोबतचा शरद पवारांचा फोटोही समोर आला. अर्थात, नात्याच्या पलिकडं जाऊन या फोटोवरून राजकीय चर्चा सुरु झाली. मात्र सध्या तरी पवार कुटुंबीयांमध्ये काहीही राजकीय सुरु नसल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलं. 

रोहित पवार म्हणाले की, "सुनेत्रा काकींमध्ये मी अजित काकांना पाहतो. दादांची पोझिशन जी होती तीच पोझिशन सुनेत्रा पवारांना मिळावी हीच आमची इच्छा आहे. सुनेत्रा काकी, पार्थ, जय पवार आम्ही या दुःखातून सावरलो नाही. राजकीय विचार मनामध्ये येत नाहीत, ही घटना दुर्दैवी आहे. आतापर्यंत पवार कुटुंबीयात कुठली राजकीय चर्चा झालेली नाही. 9 तारखे नंतर राजकीय चर्चा कुटुंबात होईल."

राजकारणात मोठी चर्चा

अजित पवारांच्या अंत्यसंस्कारापूर्वीच विलिनीकरणाची चर्चा कुणी सुरु केली, असा सवाल करत सुनील तटकरेंनी शरद पवारांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा फोटो समोर आल्यानंतर मात्र तटकरेंनी गैरसमज टाळण्याचा सल्ला दिला. या फोटोत काहीही राजकीय नसल्याचं तटकरेंनी निक्षून सांगितलंय. 

या फोटोलो संजय राऊतांनी ठाकरेंच्या एकत्र येण्याशी जोडलंय. संजय राऊत म्हणाले की, "आता ठाकरे कुटुंब एकत्र आले ना... राजकारण, मतभेदापलिकाकडे कुटुंब असते. पवार आणि ठाकरे या दोन कुटुंबींनी महाराष्ट्राला मार्ग दाखवला आहे. शरद पवार हे भीष्मपिता आहेत आणि ते आता एकत्र परिवारात चर्चा करत असतील ते कर्तव्य करत आहेत."

राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यानंतरही पवार कुटुंबातले बंध कमी झाले नव्हते. हेच बंध आजही कायम असल्याचं दिसून येतंय. अर्थात, हे बंध भविष्यातली दोन्ही पक्षांची दिशा ठरवण्यासाठी पुरेसे ठरणार का आणि कौटुंबिक कटूता टाळून भविष्यातला राजकीय तोडगा काढण्यात पवार कुटुबीयांना यश येणार का, हे लवकरच कळेल.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Ajit Pawar: सुनेत्रा वहिनींच्या पत्रानंतर अजित पवारांच्या स्मारकाबाबत धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश, 'ती' गोष्ट टाळण्यासाठी निर्णय
सुनेत्रा वहिनींच्या पत्रानंतर अजित पवारांच्या स्मारकाबाबत धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश, 'ती' गोष्ट टाळण्यासाठी निर्णय
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
Embed widget