Sharad Pawar: गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात शरद पवार हे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएसोबत जाणार, असा चर्चा रंगल्या होत्या. मध्यंतरी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्याशी भेट झाल्यामुळे या चर्चांना आणखीनच हवा मिळाली होती. मात्र, सोमवारी मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण एनडीएसोबत (NDA) जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यासोबतच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि अजित पवार गटाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना अप्रत्यक्षरित्या संदेश दिला. आपल्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. हो, चर्चा सुरू आहे. मला त्यांना सांगायच आहे. आपण कुठेही जाणार नाही. आम्ही कुणासोबत जाणार नाही.  यायचं असेल तर आमच्यासोबत या, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात शरद पवार यांचा पक्ष राज्यात महाविकास आघाडी आणि देशपातळीवर इंडिया आघाडीसोबत राहून काम करेल, हे स्पष्ट झाले आहे.  (Maharashtra Politics)

Continues below advertisement

मध्यंतरी शरद पवार हे भाजपसोबत हातमिळवणी करुन एनडीए आघाडीत सामील होतील, अशी जोरदार चर्चा होती. त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होईल, अशीही वदंता होती. मात्र, शरद पवार यांनी या सर्व शक्यता पार धुडकावून लावल्या आहेत.  शरद पवार यांनी आज पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतील चर्चेविषयीही माहिती दिली. आम्ही अडीच तास एकत्र बसलो आहोत. मला अनेक वेगवेगळ्या मागण्या दुष्काळाचा निमित्ताने ऐकायला मिळाल्या. प्रांताध्यक्ष यांनी सूचना दिल्यानुसार आपण काय निवेदन आंदोलन करताना द्यायच्या आहेत, हे सांगितलं आहे. रविवारी कोअर कमिटी बैठक आम्ही घेतली. राज्य सरकारने काय काय देणे अपेक्षित आहे त्याचे निवेदन दिलं आहे. आम्ही दोन चार दिवसांत सरकारकडे याबाबत आग्रह करू. आपल्याला भांडण करायचं नाही जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करु, असे शरद पवार यांनी म्हटले.

Sharad Pawar on Drought: शरद पवारांचे दुष्काळी परिस्थितीवर भाष्य, म्हणाले..

दुष्काळाच्या निमित्ताने सरकारने तुमचे हात बळकट करणे गरजेचे आहेत. दुष्काळाच्या निमित्ताने काही निर्णय राज्यात होत असले तरी केंद्रात देखील काही निर्णय होत असतात. मी केंद्रीय मंत्रिमंडळात होतो त्यावेळी पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी बैठकीत सांगितलं होतं दुष्काळात काय निर्णय घ्यायचे याचे सर्वाधिकार खासदारांना द्या. मंत्रिमंडळ संमती न घेता ते अधिकार द्या. त्यावेळी मी जालना जिल्ह्यात गेलो होतो त्यावेळी राजेश टोपे होते त्यांनी सांगितलं होतं, मोसंबी बागा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यावेळी एक गोष्ट कळली होती, मोसंबीला कधीही मदत मिळाली नव्हती. त्यावेळी मी दिल्लीत गेल्यावर निर्णय घेतला की मोसंबी पिकाला 25 हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. तुम्ही थकबाकीदार असाल तर नवीन कर्ज तुम्हाला मिळणार नाही. याबाबत शेतकऱ्यांमधे जनजागृती होणे गरजेचे आहे. 265 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. बाकी जिल्हे त्यात नाहीत. केळी पिकाला मदत नाही. याबाबत नोंद घेणे गरजेचे आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. 

Continues below advertisement

महाराष्ट्र मधे AI शिकवण्यासाठी पहिली संस्था बारामतीत स्थापन केली आहे. नुकताच त्या संस्थेत गेलो होतो दारातून आत गेलो तेव्हा दोन  रोबोटनी मला सॅल्यूट मारला. त्यांनी अनेक गोष्टी मला करून दाखवल्या. जगात अनेक प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्ता सोडवू शकेल. त्यामुळे ते शिकायला लागेल किमान आपण तो विषय समजून घ्यायला हवे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.  जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं निवडणुक प्रक्रियेत काय होतं आहे. भविष्यात AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित साधणं निवडणुकीत वापरली जातील. त्यामुळे मी अध्यक्षांना याबाबत सांगितलं आहे. आपल्यालादेखील याबाबत काहीतरी करावं लागेल. माझ सांगणं आहे की, याबाबत छापून येणारे लेख वाचा समजून घ्या. आपल्याला हे समजून घ्यायची मानसिकता करावी लागेल, असा सल्ला शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांना दिला.

आणखी वाचा

मफलर तर फक्त निमित्त, मागे 'बडा चेहरा'; रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनी अन् मुख्य सूत्रधाराबाबत मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, '10 ऑक्टोबरला पुराव्यांसह...'