एक्स्प्लोर

Sharad Pawar-Ajit Pawar: शरद पवार अन् अजित पवार एकत्र येण्याची दाट शक्यता; बारामतीमध्ये मोठी राजकीय घडामोड

Sharad Pawar-Ajit Pawar: दुरावलेले पवार काका-पुतणे देखील एकत्र येणार का याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यान एक महत्वाची घडामोड समोर आली आहे. 

Sharad Pawar-Ajit Pawar पुणे: सध्या महाराष्ट्रात राजकीय मनोमिलनाचे वारे जोरदार वाहू लागलेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची युती होणार या चर्चा सुरू असतानाच, दुरावलेले पवार काका-पुतणे (Sharad Pawar-Ajit Pawar) देखील एकत्र येणार का याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यान एक महत्वाची घडामोड समोर आली आहे. 

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Malegaon Sugar Factory Election) दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे. 22 जून रोजी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामती तालुक्यातील एक प्रमुख साखर उत्पादन केंद्र आहे, ज्याने शेतीमालकांनासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे:

आज अजित पवारांच्या पॅनेलची अंतिम यादी जाहीर होणार-

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांकडे 21 पैकी पवार गटाने 6 जागा मागितल्या असल्याची सूत्रंची माहिती आहे. अजित पवार 6 पैकी किती जागा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज सकाळी साडेदहा वाजता अजित पवारांच्या पॅनेलची अंतिम यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर माळेगाव साखर कारखानाच्या निवडणुकीत शरद पवार गटाला किती जागा मिळतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 

दोन्ही पवारांनी ठरवलचं असेल तर अखंड राष्ट्रवादी होण्याला कोणीच रोखू शकत नाही-

एबीपी माझाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार सध्या अजित पवारांच्या पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीलासोबत घेण्यासाठी विरोध आहे. जर शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांकडे विलीन झाली तर सध्याच्या लोकसभेच्या संख्याबळानुसार सुप्रिया सुळे यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडू शकते. त्यामुळे अजित पवारांकडून इच्छुक एका वरिष्ठ नेत्याचा केंद्रीय कॅबिनेट पदाचा पत्ता कट होऊ शकतो. दुसऱ्या नेत्याचा विरोध आहे कारण जयंत पाटील राष्ट्रवादीत आले तर आपोआपच एक तर मंत्रीपद किंवा प्रदेशाध्यक्षपद त्यांना द्यावं लागेल. मंत्रिपद देण्यासाठी सध्या पक्षातील आमदारांचा जयंत पाटलाना विरोध आहे. राहता राहीला प्रदेशाध्यक्षपदाचा तर सध्या त्या पदावर सुनील तटकरे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांचा कार्यकाळ अद्याप पूर्ण झालेला नाही. एकंदरीत सध्याची दोन्ही पक्षातील ही परिस्थिती पाहता याक्षणी तरी अखंड राष्ट्रवादी होण्याची शक्यता दिसत नाही. शेवटी जाता जाता इतकंच सांगता येईल अजित पवार हे त्यांच्या पक्षातील सर्वेसर्वा आहेत तर शरद पवार हे त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. जर दोन्ही पवारांनी ठरवलचं असेल तर अखंड राष्ट्रवादी होण्याला कोणीच रोखू शकत नाही.

राज्यासह देशभरातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Sharad Pawar And Ajit Pawar: दोन्ही एकत्र येण्याच्या चर्चा अन् शरद पवार-अजित पवार एकाच मंचावर; दादांची 'ती' कृती चर्चेत, नेमकं काय घडलं?

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Embed widget