सातारा : शिवसेनेच्या सातारा जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक यांचा भव्य सत्कार आणि जाहीर सभा  साताऱ्यातील गांधी मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या सभेला शिवसेनेचे मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या घडामोडींवर भाष्य केलं. ते म्हणाले साताऱ्याचं जनमत, लोकमत आणि मताचा कौल शिवसेना- राष्ट्रवादीच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता. सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढत असून त्याचं कारण एकनाथ शिंदे असल्याचं देखील शंभूराज देसाई म्हणाले. 

Continues below advertisement

शंभूराज देसाई काय म्हणाले?

गेल्या काही महिन्यांमध्ये नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. याच्या अगोदर जिल्हा परिषदेत शिवसेनेचे दोन सदस्य निवडून आले होते. शिवसेनेचं तिकीट मिळालं नाही म्हणून विजय पवार आघाडी करुन उभा राहिला. शिवसेनेचे तीन जिल्हा परिषद सदस्य होते. आज आम्हाला तुम्हाला सांगताना आनंद होतो, जिल्हा परिषद सदस्यसंख्या तीन वरुन पंधरावर गेले आहेत. 29 पंचायत समिती सदस्य आहेत, जवळपास 30-32 नगरसेवक आहेत. एक पंचायत समिती सभापती, तीन पंचायत समित्यांमध्ये उपसभापती, एका नगरपालिकेचा नगराध्यक्ष लोकांच्या आशीर्वादानं निवडून आणला आहे. सामान्य जनतेच्या पाठबळावर निवडून आणलेला आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले.

आज जिल्ह्यात शिवसेनेचे ताकद शंभूराज देसाईंमुळं वाढत नाही. शरद कणसेंमुळं वाढत नाही, जिल्हाप्रमुखांमुळं वाढत नाही. सामान्य शिवसैनिक आमच्या सगळ्यांअगोदर आशावादी नेतृत्व एकनाथ शिंदे यांचं वाटतं, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

Continues below advertisement

सेना-राष्ट्रवादीची युती जिल्ह्यानं स्वीकारली : शंभूराज देसाई

मी सांगितलं आम्ही 15 जागा निवडून आणल्या. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपलं प्रीपोल अलायन्स होतं. जिल्हा परिषदेत बहुमताला लागणाऱ्या 37 जागा निवडून आणल्या.  काय राजकारण घडलं, कसं घडलं महाराष्ट्रानं पाहिलं, देशातील चॅनेलनं त्याची दखल घेतली. 37 जागा निवडून येऊन सुद्धा  आम्ही तुमच्यासमोर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती घेऊन येऊ शकलो नाही, आम्ही कुठतंरी कमी पडलो, कशात कमी पडलो याचा उल्लेख करणार नाही. पण, जनमत म्हणाल,लोकमत म्हणाल, मतदारांचा कौल तर तो शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता. जिल्ह्यानं ती युती स्वीकारली होती. आजही जिल्ह्यानं ती युती स्वीकारलेली आहे.  आम्हाला कुणावर टीका करायची नाही, आम्ही कोणाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केलेला नाही, असं शंभूराज देसाई म्हणाले. 

नगरपालिकेला महायुती करण्याचा प्रयत्न केला अपयश आलं. जिल्हा परिषदेला महायुती करण्याचा प्रयत्न केला, मोठ्या पक्षानं  आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. प्रतिसाद नाही मिळत बसल्यावर दोघं बैठकीला होतो, ते नाही तर आपण दोघे लढूया असं ठरलं.विधानसभेत उपमुख्यमंत्रिपदावर असताना देखील आपल्या मंत्र्यासाठी प्रखरपणे भूमिका मांडणारे नेते म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. आपल्या सहकाऱ्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे मिळालेले आहेत, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं.