Shahaji Bapu Patil on Ganesh Naik : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव पत्रिकेतून वगळल्यानंतर शिवसेनेचे सर्वच नेते आक्रमक झाले असून आता शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनीही गणेश नाईकांवर (Ganesh Naik) शेलक्या शब्दात टीका करताना त्यांना त्यांचा इतिहास आठवून दिला आहे. गणेश नाईक हा कद्रू मनाचा आणि अल्पसंतुष्ट माणूस आहे. राज्यात महायुतीच्या प्रत्येक नेत्याने साधन सुचिता ही पाळलीच पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यक्रमात पालकमंत्र्याचे नाव असणे हे पालकमंत्री पद निर्माण झाल्यापासून पाळले जात असते. गणेश नाईक हे भाजपचे निष्ठावंत वगैरे अजिबात नाही. 1997 मध्ये महायुतीचे सरकार असताना या गणेश नाईक यांनी शरद पवार यांना संपर्क साधून मनोहर जोशी यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा डाव अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी केला आहे. (Shahaji Bapu Patil on Ganesh Naik)
दरम्यान, मी आणि माझी नवी मुंबई मी इथला राजा आहे अशी त्यांची भावना आहे. लोकशाहीत हे चालत नाही. एक दिवस नव्या मुंबईच्या राजकारणातून गणेश नाईक हे संपलेले दिसतील असा टोलाही शहाजी बापू यांनी लगावला आहे.
Shahaji Bapu Patil : मुंबईत नारळाच्या झाडाखाली बसून काहीतरी कल्पना करायची आणि बोलायचबंदकरा
तृणमूल खासदारांबाबत संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाचा समाचार घेताना कोणत्या पक्षात जायचा हा निर्णय तृणमूल खासदारांचा असून त्यांनी तो दिल्लीत बसून घेतला आहे. त्या खासदारांच्या घडामोडी दिल्लीमध्ये झाल्यावर इथे मुंबईत नारळाच्या झाडाखाली बसून काहीतरी कल्पना करायची आणि बोलायचे हे संजय रावताने बंद करावे, असा टोलाही लगावला.
Shahaji Bapu Patil on Shivsena UBT : औरंगजेबाला जिकडे तिकडे संताजी धनाजी दिसायचे तसेच....
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना जसं औरंगजेबाला जिकडे तिकडे संताजी धनाजी दिसायचे तसे यांना एकनाथ शिंदे दिसत आहेत. गुवाहाटीच्या धक्क्यातून अजूनही सावरलेले नसून येत्या काही दिवसात संपूर्ण उबाठा एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना शहाजी बापू यांनी लगावला.
Shahaji Bapu Patil : मोहिते पाटलाचं राजकारण विरघळलेले, त्यात आता काही दम राहिला नाही
मोहिते पाटलाचं राजकारण विरघळलेले असून आता त्यात काही दम राहिला नाही, असा टोला शहाजी बापू पाटील यांनी मोहिते पाटलांच्या राजकारणावर लगावला. वसंत देशमुख हा साधा सरळ माणूस त्यांनी या भानगडीत पडायचे नव्हते, असे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले. सोलापूर विधान परिषदेवर सर्वात जास्त स्ट्राईक रेटने राजेंद्र राऊत विक्रमी मताने निवडून येतील. महायुती सर्व आणि महायुतीला मदत करणारे सर्व छुपे मित्र राजेंद्र राऊत यांनाच सर्वात जास्त मताने विजयी करतील, असा विश्वास यावेळी शहाजीबापू पाटील यांनी लगावला.
