अमरावती: काँग्रेसमधील युवा नेते आणि अपक्ष आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाच लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करत काँग्रेस हा देशातील विचार आहे, तो संपणार नाही असे सत्यजित तांबे यांनी म्हटलं. मात्र, राहुल गांधी काँग्रेस नेत्यांना देखील सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, राहुल गांधी अॅक्सेसेबल नाहीत असे म्हणत एका मुलाखतीत तांबे यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावरच टीका केली होती. त्यावरुन, आता काँग्रेस नेत्यांकडून सत्यजित तांबेंना प्रत्त्युतर दिलं जात आहे. माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati thakur) यांनी राहुल गांंधींबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सत्यजित तांबेना सवाल केले आहेत. तसेच, तांबे यांनाही मोदींच्या भेटीचं चॅलेंज दिलं आहे. 

Continues below advertisement


सत्यजित तांबे हे काँग्रेसचे आहेत आणि आता ते अपक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे, सत्यजित तांब्यांनी मोदींना फोन लावावा, याशिवाय महाराष्ट्रातल्या कोणीही मोदींना फोन करावा. मोदीजींनी तासाभरात कुणाला अपॉइंटमेंट दिली तर मग आम्ही पण तसंच बोलू शकतो, असे म्हणत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सत्यजित तांबेंना प्रति चॅलेंज दिलं आहे. राहुल गांधी सर्वसामान्यांमध्ये मिसळतात, भेट देतात. प्रत्येक पक्षाचा आपापला प्रोटोकॉल असतो, तो प्रोटोकॉल फॉलो केला जातो. राहुल गांधी सर्वसामान्यांना भेटतात, बोलतात आणि समन्वयक देखील करतात, असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं. ज्यांनी पक्ष सोडायचा विचार केला, अलिप्त राहण्याचा विचार केला त्यांना पक्षावर बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हणत सत्यजित तांबे यांच्यावर जोरदार टीका देखील केली. 


दरम्यान, सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांपासून काँग्रेसमध्ये काहीही वेगळे पडले आहेत. काँग्रेस पक्षातून त्यांचे निलंबन करण्यात आले होते, तेव्हा वडिल सुधीर तांबे यांच्या नेतृत्वात त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि जिंकली. तेव्हापासून ते काँग्रेसपासून काहीही दूर झाले आहेत. मात्र, अद्यापही ते काँग्रेसमध्येच असल्याचे सांगतात. 


राहुल गांधींना धमकी देणं सोपं नाही


राहुल गांधी यांना धमकी देणं सोपं नाही, असं कोणीही वायफळगिरी करत असेल तर खबरदारी आम्हाला घेता येते. आम्ही शांततेने वागणारी आणि अहिंसेची मंडळी आहोत.  पण, आता कलयुग आहे, आम्हालाही कलयुगासारखं वागता येते, असे म्हणत राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्यालाही यशोमती ठाकूर यांनी इशारा दिला आहे. 


हेही वाचा


हगवणे बाप-लेकाला आश्रय अन् गाड्यांची रसद पुरवणाऱ्या 5 धनाढ्यांना कोर्टात जामीन, माजी ऊर्जामंत्र्यांच्या मुलासह कोणाकोणाचा समावेश