एक्स्प्लोर

Satej Patil: महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला

महायुतीतील गोकुळ, जिल्हा परिषदेची आणि इचलकरंजी महापालिकेतील भांडण बघता गोकुळचा उत्पादक शहाणा आहे. एकमुखी दूध उत्पादक आमच्या बाजूने राहतील अशी मला खात्री असल्याचे सतेज पाटील म्हणाले. 

Satej Patil: महायुतीच्या भांडणामुळे गोकुळ अडचणीत आल आहे, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे असल्याचा हल्लाबोल सत्ताधारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी केला. महायुतीतील गोकुळ, जिल्हा परिषदेची आणि इचलकरंजी महापालिकेतील भांडण बघता गोकुळचा उत्पादक शहाणा आहे. एकमुखी दूध उत्पादक आमच्या बाजूने राहतील अशी मला खात्री असल्याचे सतेज पाटील म्हणाले. 

त्यांनी महापालिकेचा सुद्धा निकाल सांगितला होता 

दरम्यान, गोकुळवरून खासदार धनंजय महाडिक यांनी 25-0 विजयाचा दावा केला होता. यावरून सतेज पाटील यांनी खोचक टीका केली. महापालिकेचा निकाल सुद्धा त्यांनी सांगितला होता, चार-पाच नगरसेवक आमचे येतील असेही ते म्हणाले होते, अशा शब्दात सतेज पाटील यांनी तोफ डागली. 

राजेश क्षीरसागर यांना मंत्री व्हायची घाई लागली

आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ आंदोलनावरून राजेश क्षीरसागर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी सांगितले की, आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्री व्हायची घाई लागली आहे, कधी एकदा आबिटकर यांना बाजूला करून मी मंत्री होतोय म्हणून शासनाची बाजू परखडपणे मांडत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. 

ते म्हणाले, क्षीरसागर यांना शक्तिपीठमध्ये पडायची गरज नव्हती, हा ग्रामीण भागाचा प्रश्न आहे तुम्ही तुमच्या आमदारांना म्हणजे आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके आणि कोरे यांना तुमच्या बाजूने बोलायला लावा आणि मग तुम्ही शक्तिपीठची बाजू घ्या अशी विनंती असल्याचे ते म्हणाले. राजू शेट्टी हे राज्याचे नेते आहेत, राज्याच्या नेतृत्वावर बोलताना त्याची रिएक्शन येणारच, असे त्यांनी सांगितले. शक्तिपीठ हिताचा कसा वाटतोय आणि राज्याची वाट कशी लागते हे तुम्ही लोकांना सांगा, असे आव्हान त्यांनी दिले. या प्रकल्पातून काय नुकसान होणार आहे हे सांगा म्हणजे लोक निर्णय घेतील, कारण नसताना हा प्रकल्प राबवून शेतकऱ्यांच्या माथी हा मारला जात आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी शक्तीपीठ रद्दची भूमिका घेतली ती खरी की खोटी, असाही सवाल त्यांनी केला.

12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत आम्ही संघर्ष करणार 

निवडणुकीच्या आधी घोषणा केली ती मतं घेण्यासाठी केली, लाडक्या बहिणींची योजना तुम्ही केली, मतं मिळाली आणि आता बहिणींना तुम्ही बाजूला केलं. सरकारमधील प्रत्येकाला मुख्यमंत्र्यांसमोर मी कसा चांगला वाटेल, मुख्यमंत्र्यांना बर वाटेल असं बोलायचं हे सुरू आहे. शक्तीपीठ रद्द करण्यासाठी 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत आम्ही संघर्ष करणार असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन, वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन, वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Gopichand Padalkar On Smriti Mandhana: स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Embed widget