Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: आंदोलनात अन्नत्याग करून उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला किंवा जिवाला काहीही झाल्यास, त्याला मुख्यमंत्रीच जबाबदार असतील, असा थेट इशारा त्यांनी दिला.

Satej Patil: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना निष्पक्ष व शुद्धपणाने काम करण्याचे वचन दिलेले असते; मग सरकार राज्यातील 25 लाख तरुणांशी सूडबुद्धीने का वागत आहे? एका बाजूला 13 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे व अधिकारी बनू इच्छिणारे 25 लाख विद्यार्थी आहेत आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांचा लाडका अधिकारी आहे. मुख्यमंत्र्यांनी एका अधिकाऱ्याला वाचवण्याऐवजी विद्यार्थ्यांची बाजू घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी स्वतः याचे श्रेय (क्रेडिट) घ्यावे आणि एमपीएससी अध्यक्षांना (भीमनवार) पदावरून तत्काळ बाजूला करावे, अशा शब्दात काँग्रेसचे विधानपरिषदेमधील गटनेते सतेज पाटील यांनी हल्लाबोल केला. आंदोलनात अन्नत्याग करून उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला किंवा जिवाला काहीही झाल्यास, त्याला मुख्यमंत्रीच जबाबदार असतील, असा थेट इशारा त्यांनी दिला.
न्यायालयीन चौकशी ही केवळ एक 'फार्स' ठरेल
पाटील पुढे म्हणाले की, एमपीएससी सचिव हरपाळकर यांची बदली जर करण्यात आली, तर ती विद्यार्थ्यांच्या दबावामुळे केली की तथ्यांच्या आधारे केली, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. जर सचिवात चूक आढळली असेल, तर त्यांचे प्रमुख असलेले एमपीएससी अध्यक्ष (भीमनवार) निर्दोष कसे असू शकतात? अध्यक्ष पदावर कायम असताना केलेली न्यायालयीन चौकशी ही केवळ एक 'फार्स' ठरेल, कारण चौकशी समितीला माहिती देणारा स्वतः आरोपीच्या पदावरच बसलेला आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्वतः क्रेडिट घ्यावे
आयएएस असोसिएशनचा सरकारवर दबाव आहे का, ज्यामुळे अध्यक्षांना दूर केले जात नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी एका अधिकाऱ्यासाठी नव्हे, तर 13 कोटी जनतेसाठी शपथ घेतली आहे; त्यामुळे एका अधिकाऱ्याला वाचवण्याऐवजी 25 लाख विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहावे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यासह राज्यभरातील आई-वडील 'आंदोलन कधी संपणार' आणि 'मुलांची परीक्षा कधी होणार' या आशेने टीव्ही लावून चिंतेत बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः क्रेडिट घेऊन अध्यक्षांना तात्काळ पदावरून दूर करावे, अशी मागणी त्यांनी केली.
नातेवाईकांच्या मुलांना पास करण्यासाठीच अट्टाहास
सतेज पाटील यांनी आयोगाच्या अध्यक्षांना हटवूनच न्यायालयीन चौकशी करा अन्यथा तो केवळ फार्स ठरेल, असा इशारा दिला आहे. पाटील यांनी सांगितलं की, एमपीएससीची सीबीटी प्रणाली ही पारदर्शकतेसाठी नसून विद्यार्थ्यांसाठी 'कॉम्प्युटर बेस टॉर्चर' ठरत आहे. सीबीटी परीक्षांमध्ये हजारो पेपर संचांची क्लिष्ट प्रक्रिया असते. ही पद्धत पारदर्शकता आणण्यासाठी नसून, स्वतःच्या जवळच्या किंवा नातेवाईकांच्या मुलांना पास करण्यासाठीचा अट्टाहास आहे. परीक्षार्थींना ही प्रणाली मान्य नसेल, तर सरकारने दोन पावले मागे घेतले पाहिजेत, असे ते म्हणाले.
पडताळणी लांबवण्याच्या सूचना दिल्या जातात
त्यांनी सांगितले की, सरकार 70 हजार मेगा भरतीची घोषणा करते, परंतु त्या भरतीसाठी आवश्यक असलेल्या 5 ते 7 हजार कोटी रुपयांची तरतूद सरकारकडे नाही. ते म्हणाले की, सरकारला मुळात नवीन भरती करायचीच नाही. त्यामुळेच जाहिरातींमध्ये त्रुटी ठेवून त्यांना कोर्ट किंवा 'मॅट'मधून स्टे आणला जातो. नवीन तरुणांना संधी न देता, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या 10-15 वर्षे जुन्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन आर्थिक भार टाळला जात आहे. दरवर्षी भरती केली तरी पोलीस किंवा इतर विभागांच्या यशदासारख्या ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्याची क्षमता सरकारकडे नाही; त्यामुळे पडताळणी लांबवण्याच्या सूचना दिल्या जातात, असा आरोप त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली





















