Satara ZP Election Result 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल : 65 ZP आणि 130 पंचायत समिती जागांवर कोणाची बाजी? आज निकाल
Satara ZP election result 2026 : सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठी आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या 129 गणांसाठी मोठ्या उत्साहात मतदान पार पडलं आहे. सातारा जिल्ह्यात अंतिम आकडेवारीनुसार 67.80 टक्के मतदान झालं आहे.

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गटांसाठी आणि पंचायत समित्यांच्या १२९ गणासाठी एकूण ६७.८० टक्के मतदान पार पडले आहे. सातारा जिल्हा परिषद आणि ११ तालुक्यातील पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सातारा जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागलं आहे. भाजप (BJP), शिवसेना (Shivsena), दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) आणि काँग्रेसने (Congress) उमेदवार दिले होते. साताऱ्यात प्रचाराच्या रणधुमाळीत प्रामुख्याने महायुतीत सामना पाहायला मिळाला. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप विरुद्ध शिवसेना अशा लढती पाहायला मिळाल्या.
Satara ZP election result 2026 live updates: महायुतीत सामना
साताऱ्यात भाजपच्या प्रचाराची धुरा मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार अतुल भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सातारा जिल्ह्यात तगडी लढत दिली. पाटण, कोरेगाव आणि फलटण मतदारसंघात शिवसेना ताकदीने लढली. मंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेकडून किल्ला लढवला. विशेष बाब म्हणजे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे भाजपकडून खटाव गटातून लढल्या. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने समन्वय साधत एकत्रित येत निवडणूक लढवली. मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना किती यश येते पाहावं लागेल. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील उमेदवार उभे केले होते.
नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात
साताऱ्यात नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात असल्यानं सर्वांचं लक्ष लागलं आहे. आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे, मंत्री जयकुमार गोरे यांच्या दोन्ही वहिनी निवडणूक लढवत आहेत. सोनल गोरे आंधळी गटातून तर भारती गोरे औंध जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढ
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी 67.80 टक्के मतदान
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 67.80 टक्के मतदान झाले. खंडाळा तालुक्यात सर्वाधिक 72.93 टक्के मतदान झाले, तर महाबळेश्वरमध्ये 70.92 टक्के, फलटणमध्ये 71.85 टक्के, खटावमध्ये 70.88 टक्के, माणमध्ये 70.74 टक्के आणि कोरेगावमध्ये 70.67 टक्के मतदान झाले.कराड तालुक्यात 69.34 टक्के, वाईमध्ये 65.77 टक्के, सातारा तालुक्यात 62.42 टक्के, पाटणमध्ये61.82 टक्के तर जावली तालुक्यात 60.48 टक्के मतदान नोंदवण्यात आले. सातारा जिल्ह्यात एकूण 21 लाख 94 हजार 110 मतदारांपैकी 14 लाख 87 हजार 554 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
साताऱ्यात कोण किती जागा लढलं?
सातारा जिल्हा परिषद एकूण जागा - 65
एकूण उमेदवार - 231
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार -
भाजप - 61
शिवसेना - 31
राष्ट्रवादी - 36
राष्ट्रवादी शरद पवार-10
ठाकरे गट - 14
काँग्रेस - 8
वंचित - 8
रिपाई-2
रासप-5
अपक्ष - 27
------------------------------------
पंचायत समितीचे नाव - सातारा जिल्हा
एकूण जागा - 130
एकूण उमेदवार - 394
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार -
भाजप- 122
शिवसेना - 49
राष्ट्रवादी - 74
राष्ट्रवादी शरद पवार- 18
ठाकरे गट - 18
काँग्रेस - 5
वंचित - 2
रासप-9
अपक्ष-15

























