Satara Zilla Parishad : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दाखल घेतली आहे. नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, साताऱ्यातघडलेल्यायाराजकीय राड्यानंतर राज्याचंराजकारणतापलंआहे. अशातचयासंपूर्णप्रकरणावरभाष्यकरत कोरेगावचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) शिवसेनेला इतिहासाची आठवण करुन देतटीकाकेलीआहे. आमचं भाजपसोबत प्री-पोल अलायन्स असल्यामुळे महाविकास आघाडी सोबत जाण्यास सदस्य तयार नव्हते. ही सगळी वस्तुस्थिती मी एकनाथ शिंदे यांना आधी सुद्धा सांगितलीआहे. त्यासोबतच मी पालकमंत्र्यांशी देखील संवाद साधला होता. जर महायुती म्हणून आपण निवडणूक लढवत आहोत तर मग तुम्ही महाविकास आघाडी सोबत का जात आहात? असा प्रश्न होता असेही आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) म्हणाले. (Satara Zilla Parishad Election 2026)
Mahesh Shinde : युती एकासोबत आणि सत्ता दुसऱ्यासोबत स्थापन करायची, हे चुकीचं
दरम्यान, शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांचा काही गैरसमज झाला असेल. त्यांना वाटत होतं की बाकी पक्ष एकत्र आणून सत्ता स्थापन होईल. त्यांचा गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज दूर करू. युती एकासोबत करायची आणि सत्ता एकासोबत स्थापन करायची, हे चुकीचंहोतं. आमची बैठक झाली होती. त्यात भाजपसोबत जाण्याचा मी म्हटलं होत. एकनाथ शिंदे यांना मी भेटून सगळं सांगेल. निवडणुकीच्या आधी सुद्धा मी एकनाथ शिंदे यांना बोललो होतो. निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदेयांच्यासोबत माझं बोलणं झालं नाही, कारण आहे सगळं प्रकरण फोनवर सांगण्यासारखा नाही. असेहीमहेशशिंदेम्हणाले.
साताऱ्यात काय झालं? (Satara Zilla Parishad)
1. जि.परिषदेत शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे ६५ पैकी ३५ जागा मिळवत बहुमत
2. भाजप २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर
3. साताऱ्यात बहुमतासाठी ३३ सदस्यांच्या पाठिंब्याची होती गरज
4. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने ६ सदस्य फोडत अध्यक्ष बनवला
5. भाजपने शिवसेनेचे २,राष्ट्रवादीचे ३ सदस्य फोडले
6. भाजपने एका अपक्षाचाही पाठिंबा मिळवत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली
7. इतर दोन सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचा शिवसेनेचा आरोप
