बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस? असा जाब विचारत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी धारूर मधील एका तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर प्रकरणातील आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचे एक पथक मागावर आहे. त्या दोघांवरही धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी धारूर पोलिसांना सूचना केल्या आहेत. तर आरोपीच्या शोधासाठी एक पथक रवाना झाले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या पाहिल्यानं मारहाण
बीडच्या धारूर येथे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संबंधित बातम्या पाहिल्याने तरुणाला गंभीर मारहाण करण्यात आली आहे. जखमी तरुणावर सध्या अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशोक शंकर मोहिते आपल्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या पाहत होता. यादरम्यान वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी आमच्या बातम्या का पाहतोस, असा प्रश्न विचारत मारहाण केली.
तू येथून पुढे जर मुंडे साहेबांच्या आणि वाल्मीक अण्णाच्या बातम्या व व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी या दोघांनी दिली आहे. दरम्यान याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाला मारहाण करुन वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे फरार झाले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचे फरार आरोपी मित्र आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना अटक करण्यासाठी मोठा दबाव निर्माण करण्यात झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी विष्णू चाटे, सुदर्शन घुले अन् इतरांना अटक केली होती. वाल्मिक कराड यांना अवादा कंपनी ला खंडणी मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपींवर मकोका देखील लावण्यात आला आहे. मात्र, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.
इतर बातम्या :
