Parliament Ratna Award 2026 : यंदाच्या संसद रत्न पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्राचे विशेष वर्चस्व पाहायला मिळत आहे. संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्राल्या पाच खासदारांना संसद रत्न (Parliament Ratna Award 2026) या बहुमानाने गौरवण्यात येणार आहे. नुकताच जाहीर करण्यात आलेल्या प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार 2026 (Sansad Ratna Awards 2026) चीघोषणाकरण्यातआली यात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संसद रत्न या बहुमानाने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), नरेश म्हस्के (Naresh Mhaske), डॉ. हेमंत विष्णू सावरा (Hemant Savara) पुण्याच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), जळगावच्या लोकसभा खासदार स्मिता उदय वाघ (Smita Wagh) अशा पाच खासदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात दोन महिला खासदारांनाही संसद रत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तरयंदादेशभरात 12 खासदार आणि 4 समित्यांची निवड करण्यातआलीअसूनयात महाराष्ट्राला 5 पुरस्कार मिळाले आहे.

Continues below advertisement

Sansad Ratna Awards 2026 : संसद रत्न पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी

दरम्यान, देशभरातून जगदंबिका पाल (उत्तर प्रदेश), पी.पी. चौधरी (राजस्थान), निशिकांत दुबे (झारखंड) आणि डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (महाराष्ट्र) हे वैयक्तिक श्रेणीत निवडलेल्या खासदारांची नावे आहेत. तसेच इतर निवडलेल्या खासदारांमध्ये प्रवीण पटेल (उत्तर प्रदेश), विद्युत बरन महतो (झारखंड), लुंबाराम चौधरी (राजस्थान), श्री. नरेश गणपत म्हस्के (महाराष्ट्र) , डॉ हेमंत विष्णू सावरा (महाराष्ट्र), स्मिता उदय वाघ (महाराष्ट्र), डॉ मेधा विश्राम कुलकर्णी (महाराष्ट्र), यांचासमावेशआहे. हे सर्व संसद सदस्य 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटपर्यंत विविध श्रेणींमध्ये संसदेत त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जाते, असे प्रियदर्शनी राहुल यांनी सांगितले.

Continues below advertisement

Sansad Ratna Awards 2026 :  चार संसदीय समित्यांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कारही जिंकले 

चार संसदीय समित्यांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कारही जिंकले आहेत. यामध्ये डॉ चरणजितसिंग चन्नी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखाली वित्त समिती, सप्तगिरी शंकर उलाका यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामीण विकास आणि पंचायती राज समिती आणि कोळसा आणि खाण समिती अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. या पुरस्कार विजेत्यांपैकी जगदंबिका पाल (उत्तर प्रदेश) आणि डॉ. चरणजीत सिंग चन्नी (पंजाब) हे माजी मुख्यमंत्री होते, तर नरहरी अमीन (गुजरात) हे उपमुख्यमंत्री होते.

Sansad Ratna Awards 2026 : 2010 साली या पुरस्कार सोहळ्याचे पहिले उद्घाटन

"संसद रत्न पुरस्काराची स्थापना 2010 साली चेन्नईस्थित 'प्राइम पॉइंट फाऊंडेशन' या स्वयंसेवी संस्थेने, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार केली. कलाम यांनीच 2010 साली या पुरस्कार सोहळ्याचे पहिले उद्घाटन केले होते. प्राइम पॉइंट फाऊंडेशनने नुकताच आपला 25वा वर्धापनदिन साजरा केला आहे, असे प्राइम पॉइंट फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष तसेच संसद रत्न पुरस्कारांचे प्रणेते श्रीनिवासन यांनी सांगितले. "ज्येष्ठ पुरस्कार विजेते खासदार, निवृत्त घटनात्मक अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञ यांचा समावेश असलेली एक प्रतिष्ठित ज्युरी विजेत्यांची निवड करते. संसदेतील खासदार आणि समित्यांच्या कामगिरीच्या आकडेवारीच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाते. ही आकडेवारी पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च, लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयांकडून पुरवली जाते," असे श्रीनिवासन यांनी पुढे सांगितले.

Sansad Ratna Awards 2026: 10 लोकसभा खासदार, 2 राज्यसभा खासदार आणि 4 संसदीय स्थायी समित्यांची निवड

मागील 15 पुरस्कार सोहळ्यांमध्ये खासदार आणि समित्यांना 143 पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. प्रत्येक पुरस्कार विजेत्याने स्वतः उपस्थित राहून आपला पुरस्कार स्वीकारला आहे. हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीने दिले जातात. 16वा पुरस्कार सोहळा जुलै 2026 मध्ये नवी दिल्ली येथे होणार असून, या कार्यक्रमादरम्यान 150वा पुरस्कार प्रदान केला जाईल. ज्युरी समितीने संसद रत्न पुरस्कार 2026 साठी 10 लोकसभा खासदार, 2 राज्यसभा खासदार आणि 4 संसदीय स्थायी समित्यांची निवड केली आहे. यावर्षी आम्ही150 वा पुरस्कार प्रदान करणार आहोत," असे संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी राहुल यांनी सांगितले.