एक्स्प्लोर

Sanjay Shirsat Vits Hotel Controversy: संजय शिरसाटांवर व्हिट्स हॉटेल प्रकरणावरुन सभागृहात गंभीर आरोप, देवेंद्र फडणवीसांनी लगेच उच्चस्तरीय चौकशी लावली

Sanjay Shirsat Vits Hotel Controversy: विधान परिषदेत व्हिट्स हॉटेल टेंडर प्रकरणावरून मोठा गोंधळ झाला. अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला.

Sanjay Shirsat Vits Hotel Controversy: काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वेदांत म्हणजेच विट्स  हॉटेलच्या (VITS Hotel) लिलावावरून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर आरोप करण्यात आले होते.  संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत हॉटेलची बाजारभावानुसार किंमत 110 कोटी रुपये असतानाही, केवळ 67 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा आरोप केला जात होता. यानंतर संजय शिरसाट यांनी या टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याचे जाहीर केले होते. आता विधान परिषदेच्या सभागृहात आज व्हिट्स हॉटेल टेंडर प्रकरणावरून मोठा गोंधळ झाला. या प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा गंभीर आरोप केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली आहे. 

अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत बोलताना संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांनी नियम डावलून टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे शिरसाट यांची कंपनी संबंधित काळात नोंदणीकृत नव्हती, तरीही त्यांनी टेंडर प्रक्रियेत भाग घेतला. अशा अवस्थेत ज्याच्यामुळे ते पात्र ठरले, त्या संबंधित अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी दानवे यांनी केली. तसेच, या प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी सभागृहात "सभापती न्याय द्या!" अशा जोरदार घोषणा दिल्या, तर काही सदस्यांनी थेट शिरसाट यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

दलाली करण्यापेक्षा ऐकून घ्या : संजय शिरसाट

यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. अशा प्रकरणात पारदर्शकता असणे महत्त्वाचे आहे. यासाठी या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल, असे सांगितले. यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देताना विरोधकांना सुनावले. “दलाली करण्यापेक्षा ऐकून घ्या,” अशा शब्दांत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. मात्र, विरोधकांनी याला जोरदार आक्षेप घेतला. मंत्र्यांना अचानकपणे बोलण्याची परवानगी नाही, त्यासाठी आधी नोटीस दिली पाहिजे, असे म्हणत विरोधकांनी गोंधळ सुरु केला. संजय शिरसाट पुढे म्हणाले, “माझं नाव सभागृहात घेतलं गेलं आहे, त्यामुळे मी उत्तर देण्यासाठी आलो आहे. काही लोक म्हणतात की 160 कोटी, 200 कोटींची खरेदी व्हायला हवी होती, असे त्यांनी म्हटले.  

मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीची घोषणा

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे की, सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आता नव्याने प्रक्रिया करण्यात येईल. मंत्र्यांनी सुद्धा याबाबत खुलासा केलेला आहे. तथापि, अशा प्रकरणात पारदर्शकता असली पाहिजे म्हणून या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झाली आहे का? याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.  

आणखी वाचा

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मुलाला इंटरेस्ट असलेल्या VITS हॉटेलचा खरा मालक कोण? ऑक्शनचा नेमका इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
PM Modi on Vande Mataram: फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
Manoj Jarange and Dhananjay Munde: धनुभाऊकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, अजितदादा पापात सहभागी होऊ नका, अन्यथा... मनोज जरांगेंचा इशारा
धनुभाऊकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, अजितदादा पापात सहभागी होऊ नका, अन्यथा... मनोज जरांगेंचा इशारा
युझवेंद्र चहलच्या Ex वाईफचा गोव्यात ग्लॅम अवतार; हॉट फोटो पाहून चाहत्यांनीच श्वास रोखला!
युझवेंद्र चहलच्या Ex वाईफचा गोव्यात ग्लॅम अवतार; हॉट फोटो पाहून चाहत्यांनीच श्वास रोखला!
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
Embed widget