Sanjay Shirsat on Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे रविवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर (Delhi Tour) गेले आहेत. दिल्लीत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. या हायव्होल्टेज भेटीचे नेमके अधिकृत कारण अद्याप समोर आले नसले, तरी ही भेट आगामी विधान परिषद निवडणुकीतील (Legislative Council Election) जागावाटप आणि जागांची अदलाबदली याभोवतीच फिरत राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आता यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

संजय शिरसाट म्हणाले की, आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने वरिष्ठ नेते बोलणी करत आहेत. 17 पैकी किती जागा मागितल्या, किती मागायच्या यावर अजून कोणाकडेही स्पष्टता नाही. आम्ही सात जागा मागितल्या, राष्ट्रवादीने किती मागितल्या, भाजपाने किती मागितल्या या सगळ्या चर्चा आहेत. या चर्चेचा शेवट देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची बैठक झाल्यानंतर होणार आहे. एकनाथ शिंदे या चर्चेसाठी दिल्लीत गेलेत अशा काही बातम्या चालतात त्यात काही तथ्य नाही. शिंदे साहेब विभागाच्या काही महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला गेले आहेत. गेल्या आठवड्यात ते दिल्लीला गेले होते आणि आताही गेले आहेत. विधान परिषदेची चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणे हे मनाला पटणारं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

Mahayuti Seat Sharing: जागावाटपावरून महायुतीत धुसफूस?

दरम्यान, राज्यातील विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी येत्या 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. सत्ताधारी महायुतीचा (Mahayuti) प्राथमिक जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या फॉर्म्युल्यानुसार, भाजप (BJP) सर्वाधिक 12 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) अनुक्रमे 3 व 2 जागांवर समाधान मानावे लागू शकते. मात्र, महायुतीत 1 ते 2 जागांवरून अजूनही वाद सुरू आहे. शिंदे गटाने विधान परिषदेच्या 7 जागांची मागणी केली आहे, तर भाजपने त्यांना केवळ 4 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आपल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी गेले असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Continues below advertisement

Vidhan Parishad Election 2026: प्राथमिक चर्चेनुसार कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा दावा?

महायुतीमधील पक्षांच्या दाव्यानुसार जागांची प्राथमिक विभागणी खालीलप्रमाणे आहे.

1. भाजप (12 जागा):नागपूर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, सातारा-सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा-गोंदिया, अमरावती, लातूर-धाराशीव-बीड आणि सोलापूर.

2. शिवसेना (3 जागा):ठाणे, नाशिक आणि यवतमाळ.

3. राष्ट्रवादी काँग्रेस (2 जागा):रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हिंगोली-परभणी.

Vidhan Parishad Election 2026:  निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना जारी : 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून

अर्जाची छाननी : 2 जून

अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून

मतदान : 18 जून - स. 8 ते दु. 4.

मतमोजणी : 22 जून

Vidhan Parishad Election 2026:  १७ जागांवर आधी कोण होते आमदार?

  1. सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजप)
  2. अहिल्यानगर : अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)
  3. ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)
  4. जळगाव : चंदूभाई पटेल (भाजप)
  5. सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस)
  6. नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस)
  7. यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
  8. पुणे : अनिल भोसले (राष्ट्रवादी)
  9. भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप)
  10. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
  11. नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)
  12. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (भाजप)
  13. अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)
  14. धाराशिव-लातूर-बीड : सुरेश धस (भाजप)
  15. परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना)
  16. छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना)
  17. नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Amit Thackeray Birthday: भावाच्या बर्थडेला शुभेच्छा द्यायला आदित्य ठाकरे शिवतीर्थवर, राज ठाकरे समोर दिसताच पाया पडले, पाहा PHOTOS