Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke's Parents: नीट पेपरफुटी प्रकरणात देशभरात तीव्र जनआक्रोश आणि 'जेन झी' (Gen Z) विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राजीनामा द्यावालागलाय. शिक्षणमंत्र्यांनीदिलेल्यायाराजीनाम्यानंतर (Resignation) कॉकरोच जनता पार्टीसह (CJP Protest) देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. अशातच तरुणाईचा आणि विद्यार्थ्यांचा हा मोठा विजय असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संयुक्त नेतृत्त्वाखाली आज (रविवारी) मुंबईत भव्य 'तिरंगा रॅली' काढण्यात येत आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांच्या लढ्याला मिळालेल्या यशाचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. तरदुसरीकडेशिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी अभिजीत दिपकेंच्या घरी जात अभिजीतच्याआई-वडिलांचीभेटघेतलीआहे. मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दिपकेंच्या कुटुंबीयांचीभेटघेतलीआहे. (Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family)

Continues below advertisement

Sanjay Shirsat : . दिपके कुटुंबाशी आमचे नातेसंबंध, आंदोलनादरम्यान प्रकरणाला राजकीय वळण लागू नये म्हणून...

दिल्लीतील आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मंत्री संजय शिरसाठ यांनी छत्रपती संभाजीनगर येथे अभिजीत दिपके यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. दिपके कुटुंबाशी आमचे नातेसंबंध आहेत. आंदोलनादरम्यान प्रकरणाला राजकीय वळण लागू नये म्हणून घरी आलो नव्हतो. आता अभिजीतच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो असून सरकार त्याची योग्य ती काळजी घेईल, अशीप्रतिक्रियामंत्रीसंजय शिरसाठ यांनी दिली. तर, मंत्री शिरसाठ यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे मनातील प्रश्न मिटला. आंदोलनादरम्यान राजकारण होऊ नये म्हणून आंदोलनाच्या काळात ते आले नव्हते. आंदोलनाला यश मिळाल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांनी दिली.

Continues below advertisement

Sanjay Shirsat: अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांचीभेटघेतचर्चा, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट हेछत्रपतीसंभाजीनगरचेपालकमंत्रीआहेत. मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात जे काम विरोधी पक्षांना जमलं नाही, ते काम 'जेन झी' (Gen Z) विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनानं करून दाखवलं आहे. असे असतानायालढ्यासाठीखऱ्याअर्थानेपुढाकारघेऊनलढ्याला पूर्णत्वाकडेवाटकरूनदेणारंनेतृतम्हणजेचअभिजितदिपकेहेठरलेआहे. अशातचपालकमंत्रीयानात्यानेआता शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांचीभेटघेतचर्चाकेलीआहे. एकीकडे, धर्मेंद्र प्रधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत महत्त्वाचे आणि पॉवरफुल मंत्री मानले जात होते. त्यांच्या या राजीनाम्यानंतर देशभरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. तरदुसरीकडेआता मंत्री संजय शिरसाट यांचीभेटअनेकअर्थानेमहत्वाचीमनालीजातआहे.

Who Is Abhijit Dipke : कोण आहे अभिजीत दीपके?

मूळ गाव : हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी.

वास्तव्य : वडिलांच्या नोकरीमुळे छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण व वास्तव्य.

शिक्षण : पुण्यातून पत्रकारितेचे शिक्षण, त्यानंतर अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून पब्लिक रिलेशन्समध्ये एम.एस्सी. (M.Sc.).

अनुभव : 2020 ते 2022 दरम्यान 'आम आदमी पार्टी'च्या (AAP) सोशल मीडिया टीममध्ये प्रमुख स्वयंसेवक म्हणून काम. 2020 च्या दिल्ली निवडणुकीतील अनेक प्रसिद्ध राजकीय मीम्सची संकल्पना त्याचीच होती. 

CJP Formation CJI Remark : 'कॉकरोच जनता पार्टी'ची स्थापना कशी झाली?

या पक्षाच्या स्थापनेमागे सरन्यायाधीशांची एक टिप्पणी कारणीभूत ठरली. 15 मे 2026 रोजी बोगस पदव्यांशी संबंधित एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी "काही बेरोजगार लोक झुरळांसारखे (कॉकरोच) असतात, जे सोशल मीडिया आणि आरटीआयच्या माध्यमातून सरकारला ट्रोल करतात," अशी टिप्पणी केली होती. या वक्तव्याला उपरोधिक उत्तर देण्यासाठी 16 मे रोजी अभिजीत दिपकेने 'कॉकरोच जनता पार्टी'ची स्थापना केली. सोशल मीडियावर पक्षाचे सदस्यत्व जाहीर करताच काही दिवसांतच CJP चे फॉलोअर्स भाजप-काँग्रेससारख्या बड्या पक्षांपेक्षाही अधिक झाले.

इतर महत्वाच्या बातम्या