Sanjay Raut On Sachin Ahir: सहा खासदार फुटून दोनच आठवडे लोटले, तेवढ्यात शिंदेंनी (Eknath Shinde) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दुसरा मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे, इतकंच काय तर, आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) वरळीचा आमदार बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानपरिषद आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) फुटले आहेत. उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेसेनेकडून उपसभापतीपदासाठी अर्ज भरला आहे. सचिन अहिर यांनी ज्यावेळी अर्ज भरला त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Deputy CM Sunetra Pawar), भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. सहा खासदारांच्या धक्क्यातून आता कुठे सावरत असलेल्या ठाकरे सेनेला शिंदेंनी मोठा धक्का दिलाय. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक होतेय. या निवडणुकीत सचिन अहिर यांच्या उमेदवारीनं राजकीय वर्तुळासह ठाकरेंच्या गोटात भूकंप आलाय. अशातच आता शिंदेंनी ठाकरेंना दिलेल्या या राजकीय धक्कातंत्रावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट केलंय. ट्वीटमध्ये संजय राऊतांनी सचिन अहिर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केलाय. तसेच, त्यासोबत कॅप्शनमध्ये कवी सुरेश भट यांच्या गाजलेल्या कवितेच्या काही ओळी पोस्ट केल्यात.
संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलंय? (Sanjay Raut Tweet On Sachin Ahir)
उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी अर्ज भरला आहे. तेव्हाचाच हा फोटो आहे. हा फोटो शेअर करत कवी सुरेश भट यांच्या 'उषःकाल होता होता' या अजरामर कवितेतील काही ओळी लिहिल्या आहेत.
संजय राऊतांनी फोटोसोबत लिहिलंय की, "आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?" (पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेईमानीचा कीडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचे दुःख का करावे)
सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ का सोडली? (Sachin Ahir Part Ways With Uddhav Thackeray Shiv Sena)
सचिन अहिर फुटले असून शिंदेंच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन विधान परिषदेचे आमदार होते त्यातील सचिन अहिर होते. मागील काही दिवसांपासून सचिन अहिर यांना शिंदे शिवसेनेकडून प्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आलेली. पण, खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रवेशानंतर सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी तयार झाल्याची माहिती, समोर आली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पाहता शिंदे शिवसेनेकडून त्यांना उपसभापती पदाची संधी देण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यानंतर तातडीनं शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय सचिन अहिर यांनी घेतल्याची माहिती समोर येतेय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
