एक्स्प्लोर

Sanjay Raut: दोन भावांचं अब की बार 75 पार, दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या; ठाण्यासाठी संजय राऊतांनी 'मनसे' रणशिंग फुंकलं

Sanjay Raut: ठाणे महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार आहेत, अशी थेट घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut: ठाणे महानगरपालिकेत (Thane Municipal Corporation) शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि मनसे (MNS) एकत्र लढणार आहेत, अशी थेट घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. ठाण्यात ठाकरे हे ठिकऱ्या उडवतील, असा इशारा देखील संजय राऊतांनी दिलाय. दोन भाऊ एकत्र लढतील, तेव्हा ताकद दिसेल. दोन भावांचं अब की बार बार 75 पार, असे म्हणत भाजपच्या अब की बार 70 ला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दोन ठाकरे बंधूंची अधिकृतपणे राजकीय युतीची घोषणा कधी होईल? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली असताना खासदार संजय राऊत यांनी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

Sanjay Raut: संजय राऊतांनी 'मनसे' रणशिंग फुंकलं

संजय राऊत पत्रकार परिषद म्हणाले की, आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार आहोत. आमचा नारा 75 पार आहे. ते जे म्हणतील त्याच्यापेक्षा आम्ही पाच जास्त सांगू. दोन ठाकरे आहेत. दोन ठाकरे सब पे भारी. यावर चर्चा होत राहील. हा सोबत आहे का? तो सोबत आहे का? पण या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या. जेव्हा दोन भाऊ एकत्र येणार तेव्हा आमची ताकद दिसेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

Sanjay Raut on Harshvardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही, असे वक्तव्य केले. तसेच, महाविकास आघाडीत मनसेला घ्यायचे असल्यास तो निर्णय दिल्लीतून होईल, असे देखील ते म्हणाले होते. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अजून मनसेचा प्रस्ताव दिलेलाच नाही. त्यांची वर्किंग कमिटी असते. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीचा तो पक्ष आहे. तो अजूनही तसाचं आहे, असे त्यांनी म्हटले. 

Sanjay Raut on Ashish Shelar: राऊतांची आशिष शेलारांवर टीका

आम्ही हिंदुत्ववादी असल्याच्या घोषणा यांनी शिवाजी पार्कवर केल्या होत्या, पण यांच्या हिंदुत्वाचा रंग काँग्रेसच्या टिळक भवनापर्यत जाऊपर्यंत विरला असा टोला मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना लगावला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांच्याकडे चहा प्यायला जाऊ नका आणि नाटक करू नका. भाजपचा रंग भ्रष्टाचाराचा आहे. भाजप पक्ष भाजपचा राहिला का? सगळे काँग्रेस, राष्ट्रवादीवाले भाजपमध्ये आले आहेत. स्वत:ची पोरं जन्माला घाला, दुसऱ्यांची पोरं किती वेळ खेळवणार तुम्ही? असे म्हणत त्यांनी आशिष शेलारांवर टीका केली. 

आणखी वाचा 

शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र! 1 मिनिटात उद्धव ठाकरेंनी जिंकली सर्वांची मनं, नेमकं काय म्हणाले? 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackceray Audio Clip: उद्धव ठाकरेंनी ऐकवली फडणवीस-पवार यांची ऑडिओ क्लिप
BJP's Power Play: 'मित्रपक्षांची कोंडी'! शिंदे-पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची नवी रणनीती
Mumbai Local Updates : रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ajit Pawar Land Scam: 'माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल तर…'; Ajit Pawar यांचा थेट इशारा
Ajit Pawar Pune Land Deal: पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून अजित पवारांची राजीनाम्याची मागणी, चौकशी कोण करणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Supriya Sule on Parth Pawar: पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
Sangli News: थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
Embed widget