Sanjay Raut on Vijay Thalapathy: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सुपरस्टार विजय थलपती याच्या 'टीव्हीके' (TVK) पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक यशानंतरही सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "भाजपने देशभरात सगळे कोश्यारीच नेमले आहेत," असा टोला लगावत त्यांनी राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Continues below advertisement

Sanjay Raut on Vijay Thalapathy: तामिळनाडूचा सत्तासंघर्ष आणि राऊतांचा बाण

तामिळनाडूमध्ये विजय थलपती याच्या पक्षाने 234 पैकी 108 जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यापासून विजय अवघे काही पाऊल दूर असून काँग्रेसने (5 आमदार) त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, तरीही राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले नसल्याचा आरोप होत आहे.

यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, तामिळनाडूमध्ये राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे राज्यपाल आहेत. ते भाजपचे राज्यपाल आहेत. विजय थलपती याने विजय मिळवला आहे. त्याच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तरीही भाजपचे राज्यपाल आडमुठी भूमिका घेत आहेत. सत्ता स्थापनेसाठी विजय थलपतीला बोलवत नाहीत. भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळीकडे कोश्यारीच नेमले आहेत. काही जण धोतरात आहेत तर काहीजण सुटबुटात असल्याची टीका त्यांनी केली. 

Continues below advertisement

Sanjay Raut on Mamata Banerjee:  ममता दीदी फार मोठे आंदोलन करणाऱ्या नेत्या

पश्चिम बंगालमधील राजकीय अनिश्चिततेवर भाष्य करताना राऊत यांनी ममता बॅनर्जींचे समर्थन केले. ते म्हणाले, "बंगालमध्ये घटनात्मक पेच होईल का नाही मी सांगू शकत नाही. देशाचे गृहमंत्री आणि राज्यपाल कुठल्याही थराला जाऊ शकतात. 'मी हरले नाही' असं ममता दीदी म्हणतात, त्यांच्या 100 जागा हिसकावून घेतल्या आहेत. ममता दीदी या फार मोठे आंदोलन करणाऱ्या नेत्या आहेत. मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही, ही त्यांची भूमिका आंदोलनाची आहे," असे त्यांनी म्हटले. तसेच, पंजाबमध्ये देखील बॉम्ब स्फोट झाला, याच माध्यमातून भाजप आता तिकडे निवडणुकीची तयारी करत आहे, असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय.

आणखी वाचा 

Sanjay Raut: रिंगरोड भूसंपादनावेळी मारहाणीचा आरोप, 'त्या' महिला पोहोचल्या संजय राऊतांच्या भेटीला; राऊतांनी महिलांसमोरच प्रांताधिकाऱ्यांना फोन करून झापलं; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

Thalapathy Vijay Emotional Tribute Producer RB Choudary: विधानसभा निवडणुकीचं दणक्यात सेलिब्रेशन करणाऱ्या थलपती विजयवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीच्या निधनानं खचला, पाणावलेल्या डोळ्यांनी दिला अखेरचा निरोप VIDEO