एक्स्प्लोर

Sanjay Raut: राजेश एक्स्पोर्टस् घोटाळा प्रकरणात संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना पत्र धाडलं; म्हणले, जोरदार आवाज उठवा, गरज पडल्यास पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे धरा...

Sanjay Raut on Kirit Somaiya: राजेश एक्स्पोर्टस् आणि त्यातील संशयित राजेश मेहता प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पत्र लिहिले आहे.

Sanjay Raut : सध्या देशभरात गाजत असलेल्या राजेश एक्स्पोर्टस् आणि त्यातील संशयित राजेश मेहता प्रकरणात (Rajesh Exports scam) 15.15 लाख कोटींचा घोटाळा, सरकारची फसवणूक याबाबत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आवाज उठवावा, यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी किरीट सोमय्या यांच्या समोर काही मुद्दे मांडत या सगळ्या विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. (Sanjay Raut on Rajesh Exports scam)

Sanjay Raut: सेबी, केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून निष्पक्ष चौकशी, फॉरेन्सिक ऑडिटची मागणी करा

ज्यामध्ये राजेश मेहता-राजेश एक्स्पोर्टस् प्रकरणात तातडीने आणि जोरदार आवाज उठवा. आपल्या पक्षांच्या खासदारांना या घोटाळ्याबाबत मार्गदर्शन करा. संसदेत किंवा सार्वजनिक व्यासपीठावर हा मुद्दा उपस्थित करा. असे त्यांना सुचवण्यात आले आहे. सेबी, केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून निष्पक्ष चौकशी, फॉरेन्सिक ऑडिटची मागणी करा. PLI प्रकल्पाच्या निवडीची समीक्षा आणि गरज पडल्यास प्रकल्प रद्द करून घ्या. गुंतवणूकदारांच्या (विशेषतः एलआयसी पॉलिसीधारकांच्या) पैशांचे संरक्षण आणि नुकसान भरपाईची व्यवस्था करण्याची मागणी करा. मागणी मान्य झाली नाही तर एलआयसी मुख्यालयासमोर उपोषण करा. असा सल्लाही खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

Sanjay Raut on Kirit Somaiya: ...नाहीतर पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे धरा, आपल्या भूमिकेत सुसंगतता असणे गरजेचं

जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि संस्थांवर कारवाईची मागणी करा, नाहीतर पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे धरा. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई ही केवळ विरोधकांविरुद्ध किंवा निवडक प्रकरणांत नसावी, तर ती सत्य आणि पारदर्शकतेच्या बाजूने, कोणत्याही दबावाशिवाय असावी. आपल्या भूमिकेत ही सुसंगतता असणे गरजेचे आहे. असेही संजय राऊत म्हणाले,

Rajesh Exports scam: राजेश एक्सपोर्टस सेबीच्या निशाण्यावर; 15.15 लाख कोटीचा अपहार झाल्याच्या अहवालात उल्लेख 

सोने चांदीच्या रिफानिंगच्या उद्योगात असलेली सर्वात मोठी कंपनी राजेश एक्सपोर्टस सध्या सेबीच्या निशाण्यावर आहे. सेबीनं  राजेश एक्सपोर्टसमध्ये गेल्या 15.15 लाख कोटी रुपयांचा अपहार झाल्याच्या उल्लेख अंतरिम अहवालात केल्यानं खळबळ उडाली आहे. राजेश एक्स्पोर्टसकडून आर्थिक वर्ष 2021-25 मध्ये  15.15 लाख कोटींची अपहार केल्याचा ठपका सेबीकडून ठेवण्यात आला आहे. यानंतर या कंपनीच्या स्टॉकमध्ये घसरण सुरु आहे. राजेश एक्सपोर्टस 1995 मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली.  गेल्या तीन वर्षात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 90 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या कंपनीचा शेअर 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर आला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या दहा वर्षात म्युच्युअल फंड आणि इतर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी राजेश एक्सपोर्टसमधील गुंतवणूक कमी केली असली तरी दुसरीकडे एलआयसीनं मात्र पाच पट गुंतवणूक वाढवली.

Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसची भूमिका

राजेश एक्स्पोर्टसनं सेबीनं केलेले आरोप फेटाळले आहेत. कंपनीकडून दाखवण्यात आलेलं उत्पन्न बरोबर असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. वाल्कैम्बीचं उत्पन्न मोजण्याऐवजी सेबीकडून EBIDTA  ग्राह्य धरला गेल्यानं संभ्रम निर्माण झाल्याचं राजेश एक्स्पोर्टसनं म्हटलं. तर, वाल्कैम्बी ही स्वित्झरलँडमधील सोन्याची रिफायनरी 2015  मध्ये 400 दशलक्ष अमेरिकन डॉलर्समध्ये खरेदी केली होती. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
Delhi CJP Protest : दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; कथित 'हिंदू रक्षा दला'शी संबंधित चौघांना अटक
दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; कथित 'हिंदू रक्षा दला'शी संबंधित चौघांना अटक
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Embed widget