Sanjay Raut :'कॉकरोच जनता पार्टी'च्या (Cockroach Janta Party) जंतरमंतरवरील प्रस्तावित आंदोलनाला (Protest) अखेर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अधिकृत परवानगी दिली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) हेआंदोलनकरतआहेहि चांगली गोष्ट आहे. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशात आंदोलन झालं, असं नाही. पण सरकारने ते दडपण्याचा प्रयत्न केला. तरुण रस्त्यावर उतरला आहे. शिक्षण मंत्री यांचा राजीनामा मागितला आहे. माध्यमांवर हे दाखवू नये, असा दबाव आला आहे. सीजेपी यांचे संस्थापक जंतरमंतरवर आंदोलन करणार आहे. आंदोलन यशस्वी झालं तर सरकारला याची दखल घ्यावी लागेल. हे आंदोलन तरुणांपर्यंत पोहोचू नये, यासाठी सरकार गोपनीय तंत्र वापरत आहे. विशेष पोलिसांना याबद्दल जबाबदारी दिली आहे, असाखळबळजनकआरोपशिवसेनाठाकरेगटाचेनेतेसंजयराऊत (Sanjay Raut)यांनीकेलाआहे.

Continues below advertisement

Sanjay Raut: लोक त्यांच्या मागे चपला काठ्या घेऊन धावणार

लाखो नसेल तरी हजारो तरुण आजरस्त्यावरउतरणारआहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणारआहे. नरेंद्र मोदी जर त्या मंत्र्याचा राजीनामा घेत नसतील तर तुम्हाला स्वच्छ प्रशासन बोलण्याची गरज नाही. हे आंदोलन गृहमंत्री अमित शहा यांची जबाबदारी आहे. महाराष्ट्र हे या गुन्हाच केंद्र बिंदू आहे. सामाजिक संस्था, अनेक कार्यकर्ते एकत्र जमतात. राजकीय पक्षावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे. तरुणांनी आंदोलनात उतरावे आणि देशाच रक्षण करावं, असेवाहनदेखीलसंजयराऊतयांनी केलंआहे. निर्भय माणसं, तरुण पोहोचतील, सत्यजीत तांबे तिथे जाणार नाही. एक तरुण आंदोलन करतो आहे अटकेला घाबरत नाही. महाराष्ट्राकडून जास्त तरुणयात आहे. भाजप काही सांगतोय म्हणून विरोधी पक्ष संपणार नाही. लोक त्यांच्या मागे चपला काठ्या घेऊन धावणार आहे. काही पक्षांनी VC वरून सहभागी होऊ, अनेक पक्ष दिल्लीला उपस्थितीत राहू असंसांगितलंआहे. असेहीसंजयराऊतम्हणाले.

Continues below advertisement

Sanjay Raut : राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद ओपन करा, देशाच्या निवडणुका मत पत्रिकेवर घ्या

विधान परिषद बरखास्त करा, असे सुधीर मुनगंटीवार यांना का वाटतं आहे. तुम्ही लोकांनी जो घोडेबाजार केला, त्यासाठी आमच्याकडे पैसे नाही, पैसे कोणाकडे आहे, तर शिंदे, फडणवीस, अजितदादा गटाकडे आहे. अदानीकडे आहे. राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद ओपन करा. देशाच्या निवडणुका मत पत्रिकेवर घ्या. या सगळ्या निवडणुका मत पत्रिकेवर घ्या, घ्यायलाच पाहिजे. विधान परिषदेच्या सर्व निवडणुका या मत पत्रिकेवर घ्या. तुम्ही तुमचं मत माझ्यांपक्षाचा व्हिप नुसार केलं हे दाखवाव. सत्ता अमर नसते. असेहीसंजयराऊतम्हणाले.

Sanjay Raut on Raj Thackeray राज ठाकरे यांच्याशी गप्पा मारल्या, अराजकीय चर्चा केली

राज ठाकरे यांच्याशी गप्पा मारल्या, अराजकीय चर्चा केली. वारंवार सांगितले की बॅलेट पेपरचा वापर करा, अस राज ठाकरे म्हणाले. हा विषय मी उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. जोपर्यंत तसं होत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा. नोटा आणि त्यांची लोक बॅग घेऊन फिरत होते. गाडीच्या डिक्कीत पैसे होते. जर तुम्ही जिंकणार आहात तर दबाव का आणता? एकनाथ शिंदे स्वप्नात पण बॅग दिसतात, आम्ही फाटकी लोक आहोत. नाव घेऊ शकतो, बॅग घेऊन कोण फिरत होत त्यांची, असेहीसंजयराऊतम्हणाले.