Sanjay Raut: ‘इडियट’ हा काही असंसदीय शब्द नसल्याचे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाचा दाखला देत भारतीय राजकारणातील ‘थ्री इडियट्स’ कोण आहेत, हे सर्वांना चांगलेच माहीत असल्याचे म्हणत राऊत यांनी केंद्र आणि महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ‘एक इडियट महाराष्ट्रात आहे. दोन केंद्रात आहेत,’ असा थेट टोला त्यांनी लगावला.

Continues below advertisement

संजय राऊत आज (दि. 17) नाशिक दौऱ्यावर असून खड्ड्यांविरोधात नाशिकमध्ये उबाठा गटाचा (UBT) मोर्चा आयोजित करण्यात आलाय. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी ‘इडियट’ या शब्दावरून सुरू झालेल्या राजकीय वादावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

Sanjay Raut: इडिटयला इडिटच म्हटलं पाहिजे ना

केंद्रीय मंत्रिमंडळात इडियट आहेत, असं तुम्ही काल म्हणाला होता. तुमच्या मते भारतीय राजकारणातील थ्री इडियट्स कोण? असा सवाल संजय राऊत यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं. संजय राऊत म्हणाले, "हे लोक इडियटच आहे. इडिटयला इडिटच म्हटलं पाहिजे ना. अमित शाह म्हणतात माफी मागा. हे इडियटपणाचंच लक्षण आहे. ज्यांना वंदे मातरमचा इतिहासच माहीत नाही. वंदे मातरमचं ऊर्जा स्त्रोत काय आहे? कुठून आलं? अन् काँग्रेसला म्हणतात माफी मागा. तुम्ही आधी माफी मागा. तुम्ही संसदेतून पळून गेला. इडियट नाही का? मोदी पळून गेले. इडियट नाही का? रोज पेपर फुटत आहेत. मंत्री इकडे तिकडे फिरत आहेत. परवा लालकिल्ल्यावर टेलिप्रॉम्प्टर बंद पडला. मोदींना भाषण जमलं नाही. कुणाला इडियट म्हणायचं तुम्ही?," असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Continues below advertisement

Sanjay Raut: एक इडियट महाराष्ट्रात, दोन केंद्रात 

पुढे ‘इडियट’ हा शब्द असंसदीय नसल्याचे सांगताना राऊत म्हणाले, "इडियट हा काही असंसदीय शब्द नाही. या देशात थ्री इडियट नावाचा सिनेमा आला. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मोदी म्हणाले, तो सिनेमा पाहा. भारताच्या राजकारणातील थ्री इडियटस कोण हे तुम्हाला माहीत आहे. एक इडियट महाराष्ट्रात आहे. दोन केंद्रात आहेत," असं संजय राऊत म्हणाले.

आणखी वाचा 

जामनेरचा 'खड्डे महाकाल' बाहेर काढा, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल; शिवसैनिक आक्रमक, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा