Sanjay Raut: अमित शाहांनी मुंबईपेक्षा आसाम, बंगालकडे लक्ष द्यावं; जरांगे अन् विद्यानंद बापटांच्या मुद्द्यावर संजय राऊत म्हणाले, 'सरकारला शिव्याचीच भाषा कळत असेल तर तीच...'
Sanjay Raut: देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत येणे थोडे कमी केले पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut PC) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर आणि राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, "अमित शाह यांनी आसामला गेले पाहिजे. आसाममधील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आहे, तसेच बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुंबई दौऱ्याचे कारण सांगताना ते म्हणाले, "मुंबईत अमित शाह यासाठी येतात कारण मुंबईतून त्यांना कोट्यवधी रुपये, हजारो कोटींच्या थैल्या देणारे मोठे बिल्डर आणि जमिनीचे व्यवहार करणारे लोक आहेत. ज्यांच्या जीवावर भाजपचा फंड चालतो, ते लोक मुंबईत आहेत. अमित शाह हे एकेकाळी शेअर बाजारात काम करत होते. त्यामुळे मुंबईत शेअर बाजार आणि उद्योगपती असल्याने ते इथे राहतात. मात्र, देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत येणे थोडे कमी केले पाहिजे. ते एकदम ६-७ गाड्या घेऊन येतात, पण आम्ही त्यांना गॅरंटी देतो की त्यांनी १-२ गाड्या घेऊन फिरावे, मुंबईकर त्यांना हात लावणार नाहीत."(Sanjay Raut PC)
देशाचे गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये आहेत हे काय आश्चर्याची किंवा फार मोठी वेगळी बातमी असं नाही, अलिकडच्या काळामध्ये जेव्हा पासून जंतर-मंतर आंदोलन दिल्लीमध्ये झालं आहे, त्यापासून ते फार दिल्लीमध्ये नसतात आणि शक्यतो ते मुंबई मध्ये असतात. ते जेव्हा मुंबईमध्ये असतात तेव्हा त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा ताण मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई पोलिसांवर पडतो आणि त्याचा दुष्परिणाम मुंबईकर जनतेला भोगाव लागतो, आता इथे गणपतीचे उत्सव आहे, रस्त्या रस्त्यावरती मंडप आहे, मूर्ती जात आहे, लोक खरेदीला बाहेर पडले आहेत, गृहमंत्री आल्यामुळे मुंबईचा अर्धा पोलीस फोर्स हा गृहमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर आहे, रस्ते बंद केले जातात, सुरक्षिततेच्या नावाखाली बाहेर जातात, तेव्हा अजून रस्ते बंद होतात, त्याचा भुरदंड मुंबईकरांना पडतो, गृहमंत्री यांचं कार्यक्षेत्र दिल्लीत बसून काम करण्याचं आहे, जर ते दिल्लीत जात नसतील किंवा दिल्ली त्यांना जेनझीची भीती वाटत असेल तर त्यांनी मणिपूरला गेलं पाहिजे, बराच मोठा कालखंड असा आहे ते मनिपुरला गेले नाहीत, मणिपूरला देशाच्या गृहमंत्र्यांची आवश्यकता आहे, अशी अनेक राज्य आहेत, ते आसामला गेले पाहिजेत, आसामची सुद्धा कायदा सुव्यवस्था धोक्यात आहे, बंगाल मधला कायदा गंभीर झाला आहे असंही संजय राऊत म्हणालेत. (Sanjay Raut PC)
मुंबईमध्ये ते यासाठी येतात मुंबईमध्ये त्यांना पैसे देणारे जे लोक आहेत, थैली बिल्डर, व्यवहार करणारे लोक त्यांच्या जीवावर भाजपा तरारलेला दिसतो, फंड कलेक्शन मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेतून होणार त्याच्यामुळे इथे रमतात, ते एकेकाळी शेअर बाजारामध्ये काम करत होते, अमित शेअर बाजार आहे, मुंबईमध्ये पण देशाचे गृहमंत्री म्हणून इथे येणं थोडं कमी केलं पाहिजे, त्याचा फायदा जनतेला होतो, कारण मुंबई हे गजबजलेल्या शहर आहे, लोकांना सतत बाहेर पडावे लागते आणि तुम्ही जेव्हा बाहेरच्या गृहमंत्री म्हणून एकटे या एक गाडी घेऊन तुम्हाला कोणीही हात लावणार नाही, मुंबईची गॅरंटी घेतो आणि मुंबईकर गॅरंटी घ्यायला तयार असतो, तुम्ही तुमची एक गाडी घेऊन फिरा, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही असं काही महान राष्ट्र कार्य केले नाही, त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय शक्ती तुमच्या जीवावर उठलेली असते, अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली.
लालबागचा राजाचे दर्शन घेतील त्यानंतर आता बाजूला चिंचपोकळीचा चिंतामणी तिकडे देखील जाणार आहेत, कारण ते आधार गौतम अडाणी यांनी घेतला आहे, त्याच्यामुळे उद्योगपतींच्या गणपतीसाठी त्यांना जावं लागेल, त्यासाठी ते व्यवस्थेसाठी थांबले आहेत, ते सुद्धा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे, असंही राऊत म्हणालेत.
जरांगे पाटील यांचा कालचा कार्यक्रम मी पाहिला, ते मुंबईला धडकणार आहेत, बीडला येतील नंतर श्रीगोंदा मी त्यांचा दौरा पाहिला आणि कोर्टाने सांगितला आहे, त्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यांच्यामुळे ते आंदोलन करत आहेत, मला आश्चर्य वाटत आहे, त्यांच्याशी चर्चा होत नाही, चर्चा न होण्याच्या पहिलं कारण असं आहे की, त्यांची भाषा चांगली नाही. ते थोडी शिवराळ भाषा वापरतात. त्यांच्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य करता येत नाही असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारच्या काही मंत्र्यांनी हे असं वारंवार सांगितलं आहे. हेच जर कारण असेल तर पुण्यामध्ये एक विद्यानंद बापट आहेत, ते अत्यंत संस्कारी भाषेत त्यांच्या आंदोलन करत आहेत, म्हणजे विद्यानंद बापट यांचा एक आदर्श आहे, मराठी भाषा संदर्भात सभ्य संस्कारी भाषा वापरतात, पण ही भाषा वापरली म्हणून त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत का? उलट सभ्य संस्कारी आणि सुसंस्कृत भाषा वापरली म्हणून त्यांच्यावर सरकार पुरस्कृत गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, सध्या भाषा वापरणाऱ्या विद्यानंद बापट यांना धमक्या येत आहेत, त्यांना परवाच्या मोर्चाला बाहेर पडू दिलं नाही, ही संस्कारी आणि सुसंस्कृत भाषेचा हे मोल आहे, मग जरांगे पाटलांनी जर भाषा वापरली त्याच्यामुळे सरकारचा एवढा जळ फळाट व्हायचं कारण नाही, विद्यानंद बापट त्यांची सुसंस्कृत भाषा वापरत आहे, ती तुम्ही स्वीकारा त्यांच्या मागण्या मान्य करा, तुम्ही तेही करत नाही, सरकारला जी भाषा कळते ज्याला ती भाषा कळते, ती भाषा वापरावी, असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेले, सरकारला जर शिवी भाषा कळत असेल तर ती भाषा वापरायला पाहिजे, सरकारमध्ये अर्धे लोक भ्रष्ट आणि गुंडं आहेत त्यांना कोणती भाषा वापरणार, असा सवालही राऊतांनी केला आहे.
Before You Go
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha





















