Sanjay Raut on BJP : शरद पवार साहेब बोलतायत ते योग्य आहे. अजित दादांचा (Ajit Pawar) पक्ष हा एक स्वतंत्र गट आहे. त्यामुळे हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रीय नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), प्रफुल्ल पटेल (Praful Patel) सुनील तटकरे (Sunil Tatkare), हसन मुश्रीफ, यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आणि निर्णय घेतला, असं आम्ही ऐकलं अथवा वाचलं आहे. दरम्यान जोपर्यंत अजित पवारांचा दुखवटा संपणार नाही तोपर्यंत आम्ही या विषयावर राजकीय भाष्य करणार नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे. पण आम्ही सध्या बोलणार नाही. मात्र एव्हढंच सांगेन, भारतीय जनता पक्ष (BJP) हा मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष आहे. भाजपला दुखवटा दुःख याच्याशी काहीही संबंध नाही. अशी बोचारी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Sanjay Raut on Sunetra Pawar DCM Oath)
Sanjay Raut on NCP Merger : अजित पवार हयात असताना दोघे एकत्र येणे शक्य होते, पण आता....
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. या शपथविधीबाबतबोलताना खासदार संजय राऊत यांनीभाजपवरनिशाणासाधलाआहे.राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. असे आम्ही ऐकत आहोत. अजित पवार यांच्या दुःखातून महाराष्ट्र सावरला नाही. मात्र हा त्याचा पक्षाचा निर्णय आहे. असेही खासदार संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीवरून अंतर्गत पातळीवर चर्चा सुरु होत्या, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. इतकेच नव्हे, तर 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा होणार होती, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. यावरबोलतानासंजयराऊतम्हणालेकि, अजित पवार हयात असताना दोघे एकत्र येणे शक्य होते. पण आता कायहोईलहे माहीती नाही. असेही
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात याबाबत गेल्या चार महिन्यांपासून चर्चा सुरू होत्या. त्याचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे होते. आमच्या पक्षात आणि त्यांच्या पक्षात एकत्र काम करण्याचं एकमत होतं. हा निर्णय 12 तारखेला जाहीर करायचं, ही तारीख अजितदादा यांनी दिली होती. दोन्ही पक्षात सकारात्मक चर्चा होती. पण, अचानक ही घटना झाली. दादांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण व्हावी अशी सुद्धा आमची इच्छा आहे, असं शरद पवारांनी सांगितले.
Sanjay Raut on BJP : ...तर अमित शाह निर्णय घेतील
मी या विषयावर काही बोलणार नाही. भाजपच्या बाबतीत ज्या घटना घडल्या आहे त्यावर मी बोलत आहे. अजित पवार गेल्याचे दुःख घराघरात आहे. आमच्या घरात देखील दुःख आहे. अजित पवार घरा-घरातला चेहरा होता. हे राजकारण कौटुंबिक आहे. त्याचा पक्ष निर्णय घेईल. फारफार तर अमित शाह निर्णय घेतील. असेहीसंजयराऊतम्हणाले. याविषयी आमची भूमिका कशाला? अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस त्यांचे ते ठरवतील. बाळासाहेबगेल्यावरशिवसेनाहीयांनानेतृत्वहीनवाटतहोती. असेहीतेम्हणाले.
संबंधित बातमी:
