एक्स्प्लोर

Sanjay Raut on Ritu Tawade: रितू तावडे म्हणाल्या, मुंबईतील बांगलादेशी रोहिंग्यांना बाहेर काढणार; आता संजय राऊतांनी पंतप्रधान अन् केंद्रीय अर्थमंत्र्यांचं नाव घेत नव्या महापौरांना सुनावलं!

Sanjay Raut on Ritu Tawade: मुंबईला आपल्याला सेफ ठेवायचं असेल तर बांगलादेशी, रोहिंग्यांना इथून बाहेर काढावं लागेल, असे वक्तव्य रितू तावडे यांनी केले होते.

Sanjay Raut on Ritu Tawade: मुंबई महानगरपालिकेच्या नव्या महापौर रितू तावडे (Ritu Tawade) यांनी मला इथं प्रत्येक मुंबईकरासाठी काम करायचं आहे. जर मुंबईकरांची इच्छा आहे की त्यांना चालायला फुटपाथ नाही तर त्यांच्या मनात यावरुन रोष आहे. मुंबईकर हे टॅक्स पेअर आहे. मुंबईकर अलर्ट आहेत, शिक्षित आहेत, संवेदनशील आहेत. त्यांना असं वाटतंय की, आम्हाला रस्त्यावरुन चालायचय पण आम्हाला रस्ताच उपलब्ध नाही. मग या रस्त्यांवर कोणी अतिक्रमणं केली आहेत, तर बांगलादेशी रोहिंग्यांनी! त्यामुळं जर मुंबईला आपल्याला सेफ ठेवायचं असेल सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला या लोकांना इथून बाहेर काढावं लागेल आणि ही आमची प्राथमिकता आहे, असे वक्तव्य केले. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रितू तावडे यांच्यावर निशाणा साधलाय. 

संजय राऊत म्हणाले की, महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे. बांगलादेश मुक्त करण्याचे त्यांचे जे काही धोरण आहे ते त्यांच्या हातात नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात. महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे. त्या पुन्हा हिंदू-मुसलमान करणार असतील तर काल व्यासपीठावर सलमान खानला बोलावून काही उपयोग झालेला नाही, असे त्यांनी म्हटले. 

Sanjay Raut on Ritu Tawade: बांगलादेशला केंद्रीय अर्थसंकल्पात कोटी रुपयांची मदत

संजय राऊत पुढे म्हणाले की, घुसखोर बांगलादेशींना मुंबई काय तर देशातून हाकलायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. पण त्याचे राजकारण तुम्ही करत आहात ते चुकीचे आहे. महापौरांनी नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारमण यांना भेटावे आणि बांगलादेश विषयी त्यांची भूमिका काय? हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. बांगलादेशात गेल्या एक वर्षापासून ज्या हिंसक दंगली सुरू आहेत, त्यात आतापर्यंत साडेचारशे मंदिरं पाडली. हजारो हिंदू लोकांच्या घरांना आग लावली. 230 ते 240 हिंदूंची हत्या झाली, यावर देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री एक अक्षर देखील काढत नाही. उलट देशाच्या अर्थसंकल्पात भारत सरकारने हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशला काही कोटी रुपये मदत केलेली आहे. हिंदूंना मारण्यासाठी हे पैसे दिलेले आहेत का? देशाच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या कत्तली करणाऱ्या, हिंदूंची मंदिरं पाडणाऱ्या, हिंदूंच्या घरावर आगी लावणाऱ्या देशाला नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारमण काही कोटी रुपये मदत म्हणून देतात, हे मुंबईच्या महापौरांना सांगा, असे म्हणत त्यांनी मुंबई महापालिकेच्या नव्या महापौर रितू तावडे यांना सुनावले. 

आणखी वाचा 

Dadar Market: दादरच्या मार्केटमध्ये फेरीवाल्यांना उठवण्यासाठी भाजपच्या अक्षता तेंडुलकरांनी सायरन लावून रुग्णवाहिका फिरवली, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget