एक्स्प्लोर

Sanjay Raut on Rajya Sabha Election 2026: शरद पवारांच्या राज्यसभेसाठी आग्रही असणाऱ्या संजय राऊतांची भूमिका अचानक 'लवचिक'? आदित्य आणि उद्धव ठाकरेंचाही उल्लेख करत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut Rajya Sabha Election 2026: विधानसभेतील संख्याबळानुसारही यंदा शिवसेनेला संधी मिळायला हवी, असा दावा शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Sanjay Raut on Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या सात जागांसाठी लवकरच निवडणूक होणार असून महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत राजकीय चुरस वाढली आहे. या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटातही वेगवेगळ्या भूमिका दिसून येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यसभेत जावे, अशी आग्रही भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्यसभेची जागा शिवसेना ठाकरे गटालाच मिळावी, असा ठाम दावा केला आहे. आता आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावरून त्यांची भूमिका मवाळ झाली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

संजय राऊत यांनी मालेगाव येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यसभा निवडणुकीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला याविषयी माहिती नाही. मी पक्षाच्या निर्णयाशी कायम बांधील असलेला एक नेता आहे. शरद पवार जर उभे राहिले तर काय हा प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षातून कोणाला उमेदवारी दिली तर त्यांना निवडून आणणे हे आमच्या सर्वांचे काम आहे. पण जर शरद पवारांसारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्याच्यावर चर्चा करावी लागेल, इतकेच मी बोललो. मी कोणाचे नाव घेतलेले नाही. मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी बांधील आहे, असे त्यांनी म्हटले. 

Sanjay Raut on Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे मोठे नेते 

दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर पुढे अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी यांनाच पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, त्यांचे बरोबर आहे. आदित्य ठाकरे मोठे नेते आहेत. त्यांनी जे सांगितले आहे, त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

Sanjay Raut on Harshvardhan Sapkal: गटबाजीमुळे तुम्ही चंद्रपूर महापौरपद गमावले

चंद्रपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटामुळे आमचा महापौर होऊ शकला नाही, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ  यांनी केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हे चुकीचे आहे. तुमच्या आपापसातल्या गटबाजीमुळे तुम्ही महापौरपद गमावले. आम्ही तुमच्या सोबतच होतो. माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीमध्ये या दोन्ही गटांना समजवण्यासाठी उच्च पातळीवर बैठक झाली. त्यात त्यांना समज देण्यात आली. दोन गट एकत्र येऊ शकले नाहीत आणि त्याचा परिणाम चंद्रपूरमधील राजकारणावर झाला, असे त्यांनी म्हटले. 

Sanjay Raut on Rahul Gandhi: त्याचा आम्हाला अभिमान

भिवंडी न्यायालयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल आहे. या प्रकरणात नव्याने जामीनदार देण्यासाठी ते आज न्यायालयात दाखल होणार आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी किंवा संजय राऊत यांनी काही विधानं केली तर सरकारचा अवमान होतो, त्याचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

आणखी वाचा 

Thackeray Brothers: स्वीकृत नगरसेवक पदावरून टाळाटाळ, मुंबई महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये बिनसलं? नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
Bihar : बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
Who is Ali Larijani: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
अली लारीजानी: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Share Market Crash : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका,सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Embed widget