एक्स्प्लोर

Sanjay Raut on Ind Vs pak T20 World Cup 2026: भारतीय क्रिकेटपटूंना लाज वाटली पाहिजे, त्यांच्यातही अंधभक्त, भारत-पाक सामन्यावर संजय राऊत कडाडले; म्हणाले, 'उद्धव ठाकरेंची...'

Sanjay Raut on Ind Vs pak T20 World Cup 2026: भारताच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन टाळल्याच्या धोरणावरून संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Sanjay Raut on Ind Vs pak T20 World Cup 2026: भारताने टी-20 विश्वचषक 2026 मध्ये (T20 World Cup 2026) पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत सुपर-8 मध्ये दमदार एन्ट्री मारली. आधी फलंदाजी आणि मग गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर टीम इंडियाने अफलातून कामगिरी करत पाकिस्तानला लोळावलं. या सामन्यात देखील भारताच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणे टाळले. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी या धोरणावर कडाडून टीका करत याला 'मूर्खपणा' म्हटले आहे. आपल्यासारख्या देशासाठी ते योग्य नाही एक तर त्यांच्याविरुद्ध खिलाडू वृत्तीने खेळा किंवा खेळूच नका, असे देखील संजय मांजरेकर यांनी म्हटले. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारत-पाक सामन्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 

संजय राऊत म्हणाले की, खेळू नका, या मताशी मी पूर्ण सहमत आहे. हा सामना भारत-पाकिस्तान नसून जय शाह विरुद्ध पाकिस्तान असा आर्थिक सामना होता. पैशासाठी खेळायला गेलेला हा सामना होता. तुम्ही त्यांच्यासोबत खेळत आहात आणि मग निकाल लागल्यावर खिलाडू वृत्तीने एकमेकांना हस्तांदोलन केलं पाहिजे. का केले नाही? मग खेळता कशाला? भारतीय क्रिकेटपटूंना लाज वाटली पाहिजे. त्यांच्यामध्ये पण अंधभक्त भिनले आहे. त्यांना सुद्धा ड्रेसिंग रूममध्ये जाऊन धमक्या दिलेल्या आहेत. मांजरेकर यांचे म्हणणं हे शंभर टक्के सत्य आहे. खेळा किंवा खेळू नका. खेळत आहात तर खेळाडू म्हणून खेळा. माझ्या पक्षाची भूमिका आहे की पाकिस्तान सोबत खेळू नका. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ही भूमिका आहे. जोपर्यंत पहलगामचा बदला पूर्ण होत नाही, तोपर्यंत खेळू नका, असे त्यांनी म्हटले. 

Sanjay Raut on Ind Vs pak T20 World Cup 2026: पाकिस्तान आता हा देश राहिला आहे का? 

संजय राऊत पुढे म्हणाले की, हे जबरदस्तीने केले जात आहे. शेक हँड करू नका ही भारतीय जनता पक्षाची आणि सरकारची खेळाडूंवरची दादागिरी आहे. खेळताय कशाला? हा शिवसेनेचा प्रश्न आहे. पाकिस्तान खेळले केले नाही तर काय होणार आहे? पाकिस्तान आता हा देश राहिला आहे का? पाकिस्तान सोबत खेळल्याने तुम्हाला फार तर बेटिंगमध्ये हजारो कोटी रुपये मिळतील. त्यातले अर्धे पैसे पाकिस्तानमध्ये जाणार आहेत. ते पैसे दाऊद इब्राहिमकडे जाणार आणि परत दहशतवाद वाढणार, हे काय मोदींना माहित नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Shoaib Akhtar On Ind vs Pak: 2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Devendra Fadnavis: टॅरिफ वॉर झालं तेव्हा भारत झुकला नाही, कणखरपणे उभा राहिल्याने अमेरिकालाही मागे हटावं लागलं: देवेंद्र फडणवीस
टॅरिफ वॉर झालं तेव्हा भारत झुकला नाही, कणखरपणे उभा राहिल्याने अमेरिकालाही मागे हटावं लागलं: देवेंद्र फडणवीस
Harshvardhan Sapkal on PM Narendra Modi: आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
MNS Vardhapan Din 2026 : रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...
रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Govinda Denies Cheating Rumours With Wife Sunita Ahuja: गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Embed widget