मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल( सोमवारी दि. १७) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली, या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांची दिल्ली रवानगी केली जाणार असल्याच्या चर्चेवरती पूर्णविराम दिला. तारे तोडायचे, फुगे उडवायचे, पतंग उडवायची, त्याला ती उडवू द्या. कुणी काहीही म्हणत राहिले तरी मी मात्र मुंबई आणि महाराष्ट्रातच आहे, अशा शब्दांत विरोधकांना ठणकावतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (सोमवारी दि. १७) दिल्ली दौऱ्यात त्यांच्या देशाच्या राजधानीत जाण्याच्या चर्चांना  पूर्णविराम दिला. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आपल्या भावना व्यक्त करत असतानाच देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत जातील असं म्हटलं आहे.

Continues below advertisement

Sanjay Raut on  Devendra Fadnavis : कुटुंबाची व्यवस्था करावी लागते, पण देवेंद्रजींना राष्ट्र...

संजय राऊत यांनी आज (मंगळवारी ता १८) माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, जंतर मंतरच्या प्रकारानंतर त्यांना (पंतप्रधानांना) एक उत्तम कॅबिनेट बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीसांची आवश्यकता आहे असं ते सांगतात, त्यांच्या सहकाऱ्यांना सांगतात, आणि काल सुद्धा 100 टक्के त्यांनी देवेंद्रजींना सांगितलेलं असणार, मग ते रिकामटेकडे आहेत का? देवेंद्रजी हळूहळू इकडलं काम आवरतील आणि दिल्लीत जातील. आवरावं लागतं ना घर, जेव्हा आपण ते बदलतो, आता महाराष्ट्रातून अनेक लोक दिल्लीला गेलेले आम्ही पाहिलेले आहेत, यशवंतराव चव्हाणांपासून, विलासराव देशमुख असतील, शंकरराव चव्हाण असतील, गोपीनाथराव मुंडे असतील, मग मूळ घर आवरावं लागतं त्याला थोडा वेळ घ्यावा लागतो, स्थिर स्थावर करावं लागतं, आपापल्या माणसांची सोय करावी लागते, कुटुंबाची व्यवस्था करावी लागते, पण देवेंद्रजींना राष्ट्र साद घालत आहे, आणि ते जे म्हणतात मी इथेच राहणार, तुमचे खूप इच्छा आहे पण, तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला ढकलतात, त्याचं काय? तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्ही दिल्लीत जावं म्हणून देव पाण्यात घालून बसलेले आहेत, मी चांगल्या भावनेने बोलतोय, आमच्या सद्भावना आहेत, आमच्या त्यांच्याविषयी सद्भावना आहेत की, महाराष्ट्रातल्या नेत्यांने राष्ट्राच नेतृत्व करावं, या आमच्या सद्भावना आहेत, पण तुमच्यातील काहींच्या सद्भावना नाहीत, ते कधी एकदा दिल्लीत जात आहेत आणि कधी एकदा आम्ही त्यांच्या जागी बसतो, असे बरेच लोक आहेत, जसे ते देवेंद्रजी प्रधानमंत्र्यांना भेटतात तसे काही लोक अमित शाहांना भेटतात जाऊन सारखे, आता त्यांना तुम्ही दिल्लीत घेताय, आता तरी माझं करा, हे मला माहिती आहे, यांच्यापेक्षा दिल्ली मला जास्त माहिती आहे, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे. 

Devendra Fadnavis : दिल्लीत देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं?

तारे तोडायचे, फुगे उडवायचे, पतंग उडवायची, त्याला ती उडवू द्या. कुणी काहीही म्हणत राहिले तरी मी मात्र मुंबई आणि महाराष्ट्रातच आहे, अशा शब्दांत विरोधकांना ठणकावतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. १७) दिल्ली दौऱ्यात त्यांच्या देशाच्या राजधानीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. महाराष्ट्रातील विविध विकासकामे व महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. या भेटींनंतर त्यांनी पत्रकारांना दिल्ली दौऱ्याची माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांना आपली दिल्लीत नियुक्ती होणार असल्याची चर्चा असल्याबाबत प्रश्न केला. यावर फडणवीस म्हणाले, अनेक रिकामटेकडे लोक आहेत. त्यांना माझ्याबद्दल वेगवेगळी चर्चा करायला आवडते. त्यांना त्याचा आनंद घेऊ द्या. महाराष्ट्राच्या जनतेसह माझे नेते नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि करत राहीन. अनेक लोकांना वाटते की, मी दिल्लीत गेले पाहिजे. पण त्या सगळ्यांना सांगतो की, मी मुंबई आणि महाराष्ट्रातच आहे.

Continues below advertisement