एक्स्प्लोर

Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार

फडणवीसांविषयी बोलताना राऊत म्हणाले की, ते सध्या केंद्रामध्ये सर्वोच्च पदावर जाण्यासाठी फक्त पाईपलाईनमध्ये आहेत आणि त्यांना त्या पाईपलाईनमधून बाहेर पडावे लागेल.

Sanjay Raut: ज्ञानेश कुमारसारखा एक दरोडेखोर जो जनतेच्या मतांवर दरोडे टाकतो, भाजपला विजय करण्यासाठी हातभार लावतो त्याच्याविरुद्ध मोर्चा काय अजून बरंच काही व्हायला पाहिजेत, पण भूमिगतच आहेत, अमित शाह भूमिगत आहेत, सीमा खन्ना भूमिगत आहेत, मोदींची सुद्धा अखेरची घरघर सुरू आहे, त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोदींचा अखेरचा काळ सुरू आहे. मोदी जानेवारी ते फेब्रुवारी या काळापर्यंत या देशाच्या सत्तेत असतील की नाही याविषयी मी वारंवार आपल्याला सांगितलेल आहे. मोदी भविष्यात काही पुढील काळामध्ये सत्तेत राहणार नाहीत, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. फडणवीसांविषयी बोलताना राऊत म्हणाले की, ते सध्या केंद्रामध्ये सर्वोच्च पदावर जाण्यासाठी फक्त पाईपलाईनमध्ये आहेत आणि त्यांना त्या पाईपलाईनमधून बाहेर पडावे लागेल. त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. 

राऊत यांनी सांगितले की, गर्जना मोर्चाला ज्या पद्धतीने मुंबईकरांनी महाराष्ट्राच्या जनतेने प्रतिसाद दिला ही देशाची भावना आहे. अखेरच्या काळामध्ये 1942 साली ब्रिटिशांच सुद्धा संतुलन मानसिक अशा प्रकारे बिघडलं होतं तसच ह्या लोकांचा मेंदू झाला आहे. जसं मुंबईच्या रस्त्यांवर शक्ती प्रदर्शन झालं, तसंच दिल्लीच्या रस्त्यावर शक्ती प्रदर्शन होत आहे. 

राऊत यांचा ओमराजेंवर सडकून प्रहार 

राऊत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गर्दीतून उस्फूर्तपणे गद्दार गद्दार गद्दार ही लोकभावना आहे. ज्यांनी गद्दारी केली, बेईमानी केली त्यांना अशा प्रकारे जागोजाग अपमानित व्हाव लागत आहे. एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला 5- 50 कोटी रुपये दिले असतील पण तो तुम्हाला प्रतिष्ठा देऊ शकत नाही. तो तुम्हाला पोलिसांच्या दोन गाड्या देऊ शकतो मागे आणि पुढे, पण प्रतिष्ठा मानसन्मान हा तुम्ही गमावला आहे. 

राऊत यांनी शिंदे यांच्यावर तोफ डागली

डेप्युटी सीएमला महाराष्ट्रात दुष्काळ आहे, महाराष्ट्रात लोक रस्त्यावर आहेत, ठिकठिकाणी भ्रष्टाचाराचा डोंगर वाढला आहे, लोक परेशान आहेत आणि हे दिल्लीमध्ये जाऊन गृहमंत्र्याच्या लॉनवर गवतावर बसतात, लाज वाटली पाहिजे, महाराष्ट्राची लाज काढताय तुम्ही. दुष्काळी तालुक्यांची फक्त यादी जाहीर करून तुम्ही दिल्लीला फिरताय हा निर्लज्यपणाचा कळस असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. राऊत म्हणाले की, शिंदे अमित शाहांच्या घरामध्ये ते पेईंग गेस्ट म्हणून राहतात, कारण त्यांना सतत त्यांना भेटायला जावं लागतं.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये आणि पत्रकारिता क्षेत्रात गेली अकरा वर्षापासून कार्यरत आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये सध्या "मुंबई ब्युरो चीफ" या पदावर कार्यरत आहे. या मागील अकरा वर्षाच्या कार्यकाळात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रश्न आपल्या बातमीद्वारे महाराष्ट्रतल्या जनतेसमोर मांडत आहे. 

प्रत्येक विषयाची, बातमीची योग्य पद्धतीने मांडणी करून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या बातमीची  छाप कशी पडेल आणि लोकांपर्यंत ती सहज त्यांना समजेल अशा भाषेत कशी जाईल यासाठी प्रयत्नशील आहे. 

छत्रपती संभाजी नगर हे मूळ गाव असून पहिली ते पदवीच शिक्षण करून पुणे विद्यापीठातून मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (MCA) पूर्ण करत पदव्युत्तर शिक्षण घेतल. पदव्युत्तर शिक्षण आयटी क्षेत्रात घेतल्यानंतर  आपल्या आवडीच्या पत्रकारिता क्षेत्रात मुंबईच्या झेवीयर्स महाविद्यालयामध्ये पत्रकारिता डिप्लोमा कोर्स आणि त्यानंतर पत्रकारितेत सुद्धा एम ए (मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ) छत्रपती संभाजी नगर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा विद्यापीठातून पूर्ण केला 

एबीपी माझामध्ये 2016 पासून काम करत आहे. 2019,2024 लोकसभा विधानसभा निवडणुका, पक्ष फुटी पासून ते सत्तांतराच्या बातम्या अगदी जवळून कव्हर केल्या, शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातल्या रोजच्या घडामोडी इथपासून ते शिक्षक विद्यार्थी आंदोलनतले प्रश्न, दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेलं विद्यार्थ्यांचा आंदोलन असे अनेक विद्यार्थ्यांच्या युवांच्या निगडित घडामोडी, त्यांचे प्रश्न मांडण्याचे काम करत आहे 

विधानसभा निवडणुकीत 'पोस्टमन माझा' सारखा 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या करेक्टर रिपोर्टिंगद्वारे विविध मतदार संघातील मतदारांचे प्रश्न स्थानिक आमदार, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मांडले. महानिर्वाणदिनी भीमगीत गायिका सुषमादेवी यांचा काळाच्या पडद्याआड गेलेला  बुलंद आवाज महाराष्ट्रसमोर आणला. 

कोरोना काळात शोध पत्रकारितेतून कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत "ऑपरेशन लुटारू" या स्टिंग ऑपरेशनच्या मालिकेतून बेड पासून रुग्णवाहिकेसाठी, कोरोना टेस्टसाठी कशी लूट केली जाते अश्या अनेक गोष्टी सरकार समोर मांडल्या. 

आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले 

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र शासन पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार -2019

ईएनबीए राष्ट्रीय पुरस्कार 2019

राज्यस्तरीय युवा पत्रकार संघ पुरस्कार 2024 

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026

सन्मान देवदूतांचा पुरस्कार 2021

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

चौथा स्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार 2019

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Naigaon : नायगाव रेल्वे स्थानक प्रकरणातील पीडित युवतीला मुलगी मानून बविआचा मदतीचा हात; हितेंद्र ठाकूरांची सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
पीडित युवतीला मुलगी मानून बविआचा मदतीचा हात; हितेंद्र ठाकूरांची सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget