Sanjay Raut On Cancer : शिवसेना (Shiv Sena) ठाकरेगटाचे डॅशिंग खासदार आणि विरोधकांसाठीधडातीतोफअशीओळखअसलेल्याखासदारसंजय राऊतांवर  (Sanjay Raut)  काहीमहिन्यापूर्वीमोठाआघात (Cancer) झालाहोता. गेल्या वर्षी दिवाळीत त्यांना गंभीर आजाराचं निदान झालं होतं. याबाबत स्वत: संजयराऊतांनी ट्विट करत माहिती दिली होती. त्यांनतरत्यांनीकाहीकाळआरामकरण्याचानिर्णयघेतलाहोता. त्यांच्यायानिर्णयानंतरत्यांच्या कार्यकर्ते, समर्थकांसहराजकीयवर्तुळातमोठीखळबळउडालीहोती. सोबतचसंजयराऊतयांच्याप्रकृतीबाबतअनेकांनीचिंताव्यक्तकेलीहोती.

मात्रयासाऱ्यावरखासदार संजय राऊत यांनी बऱ्यापैकी मात मिळवत पुन्हा जोमात कमबॅक केलं. मात्रआजाराच्याकठीणप्रसंगाबाबत संजय राऊत यांनी स्वत: माहिती दिली आहे. एबीपीमाझाच्या 'माझाकट्टा' (ABP Majha Katta) याखासकार्यक्रमात संजय राऊतांनी कॅन्सरचं (Sanjay Raut On Cancer) निदान कधी झालं? आणित्यातूनत्यांनीकशीमातकेली, याबातसविस्तरमाहितीदिलीआहे.

Sanjay Raut On Cancer : संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

दिवाळीच्या दोन-तीन दिवसाआधी मला अचानक कॅन्सरचं निदान झालं. आपण अनेक दौरे करतो, दरम्यान अनेक दुखणं अंगावर काढतो. कुठेतरी काही खाण्यात किंवा झोपेत काही त्रास उद्भवला असेल, म्हणून आपण दुर्लक्ष करतो. मात्र माझा भाऊ आमदार सुनिल राऊत त्याला नेमकं काय समजलं आणि त्याने डॉक्टरांना बोलावून माझं रक्त तपासणी करून घेतली. त्यातून हे निष्पन्न झालं, कि मला पोटात कॅन्सर आहे. हे कळाल्यानंतर मी नेहमीप्रमाणे हसलो. कॅन्सर आहेचं तर आपण बघू. त्यावर मला उद्याचं दवाखान्यात ऍडमिट होण्यास सांगितलं. मात्र उद्याचं शेडूल असताना मी अचानक कसं काय ऍडमिट होईल? असं सांगितलं. मात्र भावाने आणि कुटुंबियांनी हट्ट धरून मला ऐन दिवाळीत ऍडमिट करायला सांगितलं. या दरम्यान किमोथेरपी, रेडिएशन हे फार यातनादायी असतं. ते म्हणतात ना आजारापेक्षा उपचार भयंकर असं सगळं होतं. दीड महिना जवळजवळ मी बंदिस्त होतो. कधी घरी, तर कधी दवाखान्यात असायचो. खुप अडचणी होत्या, पाणीही पिता येत नव्हतं. मात्र त्यातून मी बाहेर निघायचा प्रयत्न करतोय. असं संजय राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान, मला शक्य झालं तेव्हा मी बाहेर यायचो. मात्रशिवसेनाप्रमुख उद्धवजींचा त्याच्यावर फार कटाक्ष असतो. हा बाहेर कसा येतो? याला परवानगी दिलेली नाही. त्याला बाहेर सोडू नका. सगळ्याचं प्रेम आहे. मी बरा व्हावं, यासाठी सगळ्याचं प्रेम आहे. मी आजारपणाच्या बाबतीत अतिशहाणपणा करु नये, असं सर्वांना वाटतं. मात्र, तरी मला वाटतं की, आपल्याला यातना विसरायच्या असतील तर आपण कामात राहिलं पाहिजे. मी हॉस्पिटलमध्ये असताना वाचत होतो, लिहित होतो. फोनवरुन बोलायचो. 

मी शरद पवारांना आजारपणाबाबत सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं किमोची सायकल घ्यावी लागेल. अमूक आहे, तमूक आहे. मग त्यांनी स्वत: काय केलं. डॉक्टर कोण? असं सगळं सांगितलं. शरद पवार म्हणाले, तुम्ही जेवढी हिंमत दाखवाल, तेवढे लवकर बरे व्हाल. हे हिंमतीवर असतं. तुम्ही जेवढी जास्त हिंमत दाखवाल. उभे राहाल. डिप्रेशनमध्ये जायचं नाही. त्यापद्धतीने मी उभा राहिलो. आणखी उपचार सुरु आहेत, काही शस्त्रक्रिया व्हायच्या आहेत, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या