एक्स्प्लोर

Sanjay Raut on Sanjay Shirsat : मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर संजय शिरसाटांवर राऊतांची जहरी टीका; म्हणाले, ते अतिविशिष्ट व्यक्ती...

Sanjay Raut on Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Sanjay Raut on Sanjay Shirsat : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या बेडरुममधील एक व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शेअर केला. त्यामध्ये संजय शिरसाट यांच्या बाजूला पैशांनी भरलेली एक बॅग दिसते. शिरसाटांनी हा व्हिडीओ त्यांचा असल्याचं मान्य केलं असलं तरी त्या बॅगेमध्ये पैसे नसून कपडे असल्याची सारवासारव केली. या प्रकरणावरून संजय शिरसाट हे संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.   

संजय राऊत म्हणाले की, कायदेशीर कारवाई या राज्याचे मंत्री माझ्यावर का करतील? त्यांनी जर का मला प्रबोधन केलं, बौद्धिक घेतलं तरी मी आनंदाने ते बौद्धिक घ्यायला तयार आहे. एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध झाला, मी तो प्रसिद्ध करण्याआधी मीडियावर तो आला. त्यात या राज्याचे मंत्री आक्षेपार्ह स्थितीत बाजूला पैशाच्या उघड्या बॅगा आहेत, काही बॅगा उघड्या आहेत तर काही बॅगा बंद आहेत, काही बॅगा कपाटात आहेत असा तो व्हिडिओ आहे. जर तुम्ही जनसुरक्षा कायदा आणला आहे. मग जनहितासाठी हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असेल तर त्यात कुणाची बेअब्रू होण्याचे कारण नाही. त्यांनी त्यावर खुलासा दिलेला आहे आणि तो खुलासा देखील माध्यमांनी प्रसिद्ध केलेला आहे, असे त्यांनी म्हटले.  

संजय शिरसाट हे अतिविशिष्ट व्यक्ती

संजय राऊत पुढे म्हणाले की, व्हिडिओ मी चोरून काढलेला आहे का? मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, हा व्हिडिओ त्यांच्या घरातला आहे. ते कुठे राहतात हे मला माहित नाही. संजय शिरसाट हे अतिविशिष्ट व्यक्ती आहेत, ते महात्मा आहेत, ते संत आहेत आणि त्यांच्या संतगिरीचे पुरावे जर कोणी समोर आणले असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर कारवाई करण्याला उत्तेजन देण्यापेक्षा या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे. एक मंत्री आक्षेपार्ह अवस्थेत पैशांच्या बॅगांसह बसलेला आहे. सिगरेटचे झुरके मारत आहे. हे चित्र आमचे नाही, हे चित्र महाराष्ट्राची प्रतिमा आहे. या सरकारची प्रतिमा काय आहे? हे त्या व्हिडिओतून दिसत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. 

देवेंद्र फडणवीस अजून बोलत का नाही?

भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली किती घटिया दर्जाचे सरकार चालवले जात आहे, हे गेल्या दोन दिवसात शिंदे गटाच्या एका आमदाराने आणि एका मंत्र्याने दाखवून दिले आहे. यावर देवेंद्र फडणवीस अजून बोलत का नाही? नैतिकता हा त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष आणि संघाने आजपर्यंत काम केले आहे. मग ही नैतिकता आता कुठे गेली? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

संजय शिरसाट यांच्याशी वैयक्तिक भांडण नाही

संजय राऊत पुढे म्हणाले की,  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला नैतिकतेचे धडे देत असतात. मग तुम्ही पंतप्रधान मोदींचा तरी आदर्श पाळा आणि कालच्या प्रकरणात तुम्ही त्या गुन्हेगारांचा बचाव करू नका. माझ्यावर कायदेशीर कारवाई ही काही नवीन नाही. सामनाच्या संपादकांवर कायदेशीर कारवाई हा प्रकार नवीन नाही, अशा प्रकारच्या अनेक नोटीस आम्हाला येत असतात. आम्ही हे खटले लढत असतो. माझे संजय शिरसाट यांच्याशी वैयक्तिक भांडण नाही जे समोर आलं ते दाखवणार हे माझं पत्रकार म्हणून आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे हा अधिकार मला संविधानाने दिला आहे.  

आणखी वाचा 

Eknath Shinde: एकनाथ शिंदे आपल्याच शिलेदारांमुळे चक्रव्यूहात अडकले; भुमरे, खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत, नेमकं प्रकरण काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
Jay Pawar Rutuja Patil Marriage : फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर
फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
Devednra Fadnavis Ashiqi Song : मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी
मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी

व्हिडीओ

Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
Jay Pawar Rutuja Patil Marriage : फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर
फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
Devednra Fadnavis Ashiqi Song : मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी
मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी
Pune Leopard: वनखात्याने बिबट्याला पकडायला सापळा लावला, पण चलाख बिबट्याने बाहेरुनच कोंबडीचं मुंडकं पकडलं
वनखात्याने बिबट्याला पकडायला सापळा लावला, पण चलाख बिबट्याने बाहेरुनच कोंबडीचं मुंडकं पकडलं
Nagpur Leoprad : नागपुरात बिबट्याचा धुमाकूळ; परडीत वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु, अनेकांवर हल्ला केल्याची माहिती
नागपुरात बिबट्याचा धुमाकूळ; परडीत वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु, अनेकांवर हल्ला केल्याची माहिती
Nagpur Leopard: डार्ट लागून गुंगीचं औषध शरीरात भिनलं, तरीही बिबट्याची 15 फूट उंच उडी, अखेर गच्चीतून खाली पडला, नागपूरमध्ये बिबट्याला पकडण्याचा थरार
डार्ट लागून गुंगीचं औषध शरीरात भिनलं, तरीही बिबट्याची 15 फूट उंच उडी, अखेर गच्चीतून खाली पडला, नागपूरमध्ये बिबट्याला पकडण्याचा थरार
Devendra Fadnavis & Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी, आरडओरडा न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात: एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी, आरडओरडा न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात: एकनाथ शिंदे
Embed widget