एक्स्प्लोर

Sanjay Raut on Devendra Fadnavis : अशी कर्मकांड केली असती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं; मांसबंदीच्या निर्णयावरून राऊतांचा फडणवीसांवर प्रहार

Sanjay Raut on Devendra Fadnavis : 15 ऑगस्टला मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा हा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला निर्णय नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

Sanjay Raut on Devendra Fadnavis : राज्यातील अनेक महापालिकांनी 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद (Meat Ban) ठेवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वाद उद्भवला आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकारण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 15 ऑगस्टला मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा हा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला निर्णय नाही, तर 1988 रोजी तत्कालीन सरकारच्या काळात घेतलेला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. 

संजय राऊत म्हणाले की, महापालिका सरकारची नसते हे आज आम्हाला कळलं. महापालिकेवर प्रशासक कोणाचा आहे? राज्यातल्या 27 महापालिका सध्या फडणवीसांच्या खाजगीरित्या ताब्यात आहेत. सरकारचा निर्णय नाही हे म्हणणं म्हणजे प्रशासनासंदर्भात कमी माहिती असणे आहे. ते दोनदा, तीनदा मुख्यमंत्री झालेत. त्यांनी अशी फुटकळ विधाने करू नये, असा हल्लाबोल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.  

अशी कर्मकांड केली असती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं

संजय राऊत पुढे म्हणाले की,  तुम्ही जर निर्णय घेतला असेल तर तो का घेतला? हे लोकांना पटवून द्या. स्वातंत्र्य दिन सोहळा हा विजय उत्सव आहे. त्याच्यासाठी उपवास धरणे, अमुक करणे, तमुक करणे अशी कर्मकांड चालत नाही. अशी कर्मकांड केली असती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं. भाजपच्या नेत्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग यांचे साहित्य वाचावं लागेल. फालतू आदेश काढून त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं नाही. अनेक संप्रदाय राज्यात शाकाहारी आहेत. त्यांचा सन्मान केला पाहिजे. तरी देखील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे सैन्य शाकाहारावर चालत नाही. त्यांना त्यांचा आहार द्यावाच लागतो. एखाद्याच्या आहारावर अशी बंदी तुम्ही आणू शकत नाही, असे त्यांनी म्हटले. 

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत 

शिवसेना-मनसे युतीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रात वेगळ्या घडामोडी घडत आहेत, खास करून मुंबईसाठी घडत आहेत. त्या संदर्भात आम्ही दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांशी देखील चर्चा केली आहे. महाराष्ट्राची राजधानी गुजरातच्या ताब्यात जाता कामा नये. महाविकास आघाडीच्या नेत्यांची हीच भूमिका आहेत. उद्धव आणि राज हे दोघे भाऊ आहेत, ते एकत्र आलेले आहेत आणि महाराष्ट्राने त्यांचं स्वागत केलं आहे, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा 

Nitesh Rane : सरकार आणण्यात हिंदूंचा हात, दुसऱ्या धर्मियांनी मतदान केलं नाही: नितेश राणे

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
Anil Patil on Sunil Tatkare: सुनील तटकरे यांनी केलेलं वक्तव्य आम्हाला संभ्रमात पाडण्यासारखं, विलीनीकरण संदर्भात पक्षात कुठलीही चर्चा नाही; आमदार अनिल पाटील स्पष्टच बोलले
सुनील तटकरे यांनी केलेलं वक्तव्य आम्हाला संभ्रमात पाडण्यासारखं, विलीनीकरण संदर्भात आमदार अनिल पाटील स्पष्टच बोलले, म्हणाले...
तटकरे खोटा आणि कपटी माणूस! त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखातं हवं होतं, पण सुनेत्रा पवारांच्या खेळीनं त्यांचा डाव उलटला, महेंद्र थोरवेंचा मोठा गौप्यस्फोट 
तटकरे खोटा आणि कपटी माणूस! त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखातं हवं होतं, पण सुनेत्रा पवारांच्या खेळीनं त्यांचा डाव उलटला, महेंद्र थोरवेंचा मोठा गौप्यस्फोट 
Latur :  बँकेतील आमचा कारभार रामायणासारखा स्पष्ट, निलंगेकरांच्या आरोपांना धीरज देशमुखांचे प्रत्युत्तर
Latur :  बँकेतील आमचा कारभार रामायणासारखा स्पष्ट, निलंगेकरांच्या आरोपांना धीरज देशमुखांचे प्रत्युत्तर

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवत नजरकैदेत ठेवलं
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
Crime News: पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
Pune Crime News: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुषाचे पिशवीत तोडून टाकलेले दोन पाय, सीम कार्डचा कव्हर अन् पोलिस पोहोचले ठेककेदारापर्यंत, शेवटी गूढ उकलले!
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुषाचे पिशवीत तोडून टाकलेले दोन पाय, सीम कार्डचा कव्हर अन् पोलिस पोहोचले ठेककेदारापर्यंत, शेवटी गूढ उकलले!
Chhatrapati Sambhajinagar Crime News : मोठी बातमी : पाणी मागितल्यावर तोंडात लघवी, चौकात नेऊन जीवघेणी मारहाण, वैजापुरात भयंकर हsss कांड
मोठी बातमी : पाणी मागितल्यावर तोंडात लघवी, चौकात नेऊन जीवघेणी मारहाण, वैजापुरात भयंकर हsss कांड
Embed widget