एक्स्प्लोर

Sanjay Raut : भाजप हा देशद्रोही आणि बकवास पक्ष, सलीम कुत्ता सोडा, दाऊदलाही पक्षात आणतील; बडगुजरांच्या प्रवेशानंतर राऊतांचा हल्ला

Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सलीम कुत्ता काल वर्षा बंगल्यावर बिर्याणी खायला बसला होता का? असा खोचक सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केलाय.

Sanjay Raut : ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, असे सगळे देशद्रोही लोक भाजपने पक्षात घेतले आहेत. उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा मुस्लिमांचे मत हवी म्हणून ते पक्षात आणतील.  या लोकांचा काहीच भरोसा नाही. पाकिस्तान सोबत काहीतरी डील करतील आणि दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन यांना भाजप आपल्या पक्षात घ्यायला मागेपुढे पाहणार नाही, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी (दि. 17) भाजपमध्ये प्रवेश केला. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.  

संजय राऊत म्हणाले की, फोडा, झोडा आणि राज्य करा हे त्यांचे धोरण आहे. हिंदूंची एकजूट तोडा, मराठी माणसाची एकजूट तोडा आणि राज्य करा, हे त्यांचे धोरण आहे. मग या धोरणामध्ये त्यांना सलीम कुत्ता देखील चालतो. इकबाल मिर्ची देखील चालतो. उद्या दाऊद इब्राहिम देखील चालेल, हे त्या पक्षाचे धोरण आहे. आमचे तसे धोरण नाही. आम्ही एका वैचारिक भूमिकेतून काम करणारे लोक आहोत. जसे काल शरद पवार यांनी सांगितले की, जे भारतीय जनता पक्षासोबत गेलेले आहेत. त्यांच्यासोबत आम्ही हातमिळवणी करणार नाही, हे पक्के धोरण आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 

सलीम कुत्ताला भाजपने संत म्हणून पदवी दिली पाहिजे

संजय राऊत पुढे म्हणाले की, शरद पवार योग्य तेच बोलले आहे. मी वारंवार तेच सांगत होतो की, शरद पवार अशा प्रकारच्या कोणत्याही प्रवृत्तींना जवळ करणार नाहीत. शाहू-फुले-आंबेडकर हा जसा राज्याचा विचार आहे, त्या विचारांबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचा आणि महाराष्ट्राच्या शत्रूशी रडण्याचा लढण्याचा विचार आहे. त्यात आम्ही तडजोड करणार नाही. हे संधीसाधू आमच्याकडून एखाद्या पार्टीत गेले असतील. आम्ही त्यांचा विचार देखील करत नाही. पण, त्यांना असेच लोक लागतात. भ्रष्ट, गुंड, दाऊदचे हस्तक असे लोक त्यांना लागतात. भारतीय जनता पक्षाने सलीम कुत्ता याला संत म्हणून पदवी दिली पाहिजे. कारण ज्या व्यक्तीला त्यांनी सोबत घेतले आहे ते शिवसेनेत असताना भाजपने सलीम कुत्ता सोबत संबंध जोडून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी म्हटले. 

त्या एसआयटीचे काय झाले? 

भाजपचे सर्व लोक पलटूराम आहेत. भाजपचा पक्ष अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या विचारधारेचा पक्ष अजिबात राहिलेला नाही. प्रफुल्ल पटेल यांचे इकबाल मिर्ची बरोबर म्हणजे दाऊदच्या हस्तकाबरोबर संबंध आहेत हे नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. अशोक चव्हाण यांनी संरक्षण खात्याच्या जमिनी लाटल्या आणि देशाच्या सैनिकांशी गद्दारी केली हे नरेंद्र मोदींनी सांगितले आहे. त्यानंतर आता सलीम कुत्ता प्रकरण हे भाजपने काढले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी लावली होती. त्या एसआयटीचे काय झाले? चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सलीम कुत्ता काल वर्षा बंगल्यावर बिर्याणी खायला बसला होता का? त्यांनी सलीम कुत्ताची माफी मागितली का? या लोकांच्या मनातल्या शंका असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.  

उद्या दाऊद इब्राहीमलाही भाजपमध्ये आणतील 

भाजप बकवास पक्ष आहे. ढोंगी आणि भ्रष्ट लोकांचा हा पक्ष आहे. या पक्षा इतका देशद्रोही पक्ष देशाच्या इतिहासात कधी झाला नाही. देशद्रोही हा शब्द त्यांना लागू पडतो. कारण सगळे देशद्रोही, भ्रष्ट लोक त्यांनी आपल्या पक्षात घेतलेले आहेत. ज्यांच्यावर त्यांनी देशद्रोहाचे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, असे सगळे देशद्रोही लोक त्यांनी पक्षात घेतले आहेत. उद्या दाऊद इब्राहीमला सुद्धा मुस्लिमांचे मत हवी म्हणून ते पक्षात आणतील.  या लोकांचा काहीच भरोसा नाही. पाकिस्तान सोबत काहीतरी डील करतील आणि दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन यांना भाजप आपल्या पक्षात घ्यायला मागेपुढे पाहणार नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. 

आणखी वाचा 

Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजरांच्या एन्ट्रीने भाजपमधील संघर्ष उफाळला, नाशिकच्या राजकारणातही उलथापालथ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
Bhendwal Ghatmandni Bhavishyvani 2026: देशाचा राजा खुर्चीवर कायम राहील, पण...; भेंडवळच्या घटमांडणीत कोणकोणते भाकीत वर्तवले?
देशाचा राजा खुर्चीवर कायम राहील, पण...; भेंडवळच्या घटमांडणीत कोणकोणते भाकीत वर्तवले?
राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
Nashik Crime News: घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी
घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी
Nagpur Crime News: एनजीओमध्ये काम करणाऱ्या सहकारी हिंदू तरुणींवर इस्लाम धर्मातील परंपरा पाळण्यासाठी दबाव; NGO प्रमुखाला अटक, नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघड
एनजीओमध्ये काम करणाऱ्या सहकारी हिंदू तरुणींवर इस्लाम धर्मातील परंपरा पाळण्यासाठी दबाव; NGO प्रमुखाला अटक, नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघड
Fairness Cream Alert : सावधान! पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; छत्रपती संभाजीनगरनंतर नागपुरात धक्कादायक प्रकार उघड,
सावधान! पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; छत्रपती संभाजीनगरनंतर नागपुरात धक्कादायक प्रकार उघड
Embed widget