एक्स्प्लोर

नाकाने कांदे सोलणारे, तावातावाने बोलणारे अजित पवार कुठे फिरताय? कुंडमळा पूल दुर्घटनेवरून संजय राऊतांचा प्रहार

Sanjay Raut on Kundmala bridge collapse : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळ रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे.

Sanjay Raut on Kundmala bridge collapse : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळ रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची (Kundmala bridge collapse) दुर्दैवी घटना घडली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. एनडीआरएफच्या पथकांनी अद्यापपर्यंत 51 जणांचे प्राण वाचवले आहेत. दरम्यान, काही नागरिक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, काल मावळमध्ये पूल कोसळला पूल कोसलला आणि किमान 50 लोक वाहून गेले. माझा प्रश्न अजित पवारांना आहे. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. अनेक वर्षांपासून आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकारही आहे. मी आणि पुणे जिल्हा कोणीही वेगळं करू शकत नाही. मग कालच्या दुर्घटनेची अजित दादा पवार पालकमंत्री म्हणून जबाबदारी आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात. तेथील आमदार सुनिल शेळके यांना अजित दादा घेऊन फिरतात. त्यांच्या निवडणूकीत मोठा खर्च त्यांनी केला. एक दोन कोटीचा पूल गेल्या अनेक वर्षांमध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत. पालकमंत्री अशा लहान कामांमध्ये झोपलेले असतात आणि मोठ्या बिल्डरांचे काम, मेट्रोचे काम, मोठ्या ठेकेदारांची कामे यात पालकमंत्री जागे असतात, असा हल्लबोल त्यांनी यावेळी केला. 

पालकमंत्री कुठे फिरत आहात?

संजय राऊत पुढे म्हणाले की, काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण हे अजित दादा पवार यांनी सांगायला पाहिजे. काल तो पूल कोसळला, लोक वाहून गेले आणि मेले. अजित पवार कालपासून काही बोलण्याचे मी पाहिले नाही. एरवी मोठ्या मोठ्याने आणि तावातावाने ते बोलत असतात. त्यांची जबाबदारी नाही का? पालकमंत्री कुठे फिरत आहात? तुम्ही काय करत आहात? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

हे भ्रष्टाचाराचे आणि बेफिकरीचे बळी

आमच्या राज्याच्या मुख्यमंत्रींनी चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. खरं म्हणजे तुमच्या चौकशीच्या आदेश दिले पाहिजे, मुख्यमंत्री काय करत आहेत? तुमची चौकशी केली पाहिजे. तुम्ही आल्यापासून राज्यात दुर्घटनांची मालिका सुरू आहे. भ्रष्टाचारांच्या मालिका सुरू आहेत. हे कालचे बळी भ्रष्टाचाराचे आणि बेफिकरीचे बळी असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल पाहिजे

⁠कालच्या घटनेला अजित पवार जेवढे दोषी आहेत, तेवढेच त्यावेळचे मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. या संदर्भात यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल पाहिजे. अजित पवार नाकाने कांदे सोलत असतात. माणसांचे बळी तुमच्या राज्यात गेले आहेत. तुम्ही नैतिक जबाबदारी घ्या आणि सांगा चूक झाली, असेही संजय राऊत म्हणाले. 

आणखी वाचा 

इंद्रायणी नदी पुलाला 8 कोटी मंजूर झाल्याचा दावा, संजय राऊतांनी फक्त 80 हजारांचे पत्रच दाखवलं! म्हणाले, एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मूर्ख बनवलं जात आहे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ward Reservation: आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
Delhi Bomb Blast News: 'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Terror Plot: स्फोटामागे Jaish-e-Mohammed? डॉक्टर Umar सह अनेक जण ताब्यात
Red Fort Blast: 'डॉक्टर उमर मोहम्मदच सुसाईड बॉम्बर', पोलीस सूत्रांची माहिती
Delhi Blast : Bhutan मधून PM Narendra Modi यांचा इशारा, 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही'
Muzffar Brother Exclusive : तो दहशतवादी नाही,  तो दिल्लीत डॉक्टर होता, मुजफ्फरच्या भावाची माहिती
Delhi Blast: लाल किल्ला स्टेशनजवळ स्फोटात 12 ठार, Jaish-e-Mohammed शी संबंधित Doctors चा सहभाग असल्याचा संशय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ward Reservation: आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
Delhi Bomb Blast News: 'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
BMC Election Reservation: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महिलांसाठी 114 वॉर्ड राखीव; SC, ST साठी कोणते वॉर्ड आरक्षित?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या वॉर्डात आरक्षण? यादी जाहीर, तुमच्या वॉर्डात काय झालं?
Embed widget