Sanjay Raut: 'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut: मंत्रिमंडळातील चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय. चार प्रमुख मंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचा सनसनाटी दावा खासदार संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut: या क्षणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रथमच बंडाळीचं स्वरूप आलं आहे, जे गेल्या 10 वर्षांत नव्हतं. नरेंद्र मोदींना मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करायचे आहेत मोठ्या प्रमाणात, ते अजून करू शकलेले नाहीत. जर जुने मोदी असते, तर त्यांनी सगळं मोडून काढून, बरखास्त करून केलं असतं, पण मंत्रिमंडळातील चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय. चार प्रमुख मंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचा सनसनाटी दावा खासदार संजय राऊत यांनी केला. कोल्हापुरात दिलेल्या प्रकट मुलाखतीमध्ये राऊत यांनी हा दावा केला.
आधी अमित शहांचा राजीनामा घ्या
संजय राऊत म्हणाले की, जेव्हा मोठा फेरबदल करायचा असतो, तेव्हा मंत्र्यांचे राजीनामे आधी घेतले जातात आणि मग फेरबदल केला जातो, पण त्या चारही मंत्र्यांनी सांगितलं, आम्ही राजीनामे देणार नाही. आम्ही का राजीनामे द्यायचे याचं स्पष्टीकरण द्या. आधी अमित शहांचा राजीनामा घ्या. त्यांना वगळून आम्ही राजीनामे का द्यायचे? अशी चर्चा झाल्याचा दावा राऊत यांनी केला. त्यांनी सांगितले की, ही सुरुवात आहे मोदींच्या पतनाची. हळूहळू, हळूहळू हे बंड वाढत जाईल.
इंटरनॅशनल फोर्सेसना मोदींचं आता ओझं झालं
राऊत यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता एक नवीन ऊर्जा प्राप्त होताना दिसत आहे. त्यांनी तुमच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदलामध्ये एक डेप्युटी प्राईम मिनिस्टर नेमा, जो तुमचा वारस असेल, तो अमित शहा नाही असा निरो दिल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. याचा अर्थ मोदींची दहशत, दादागिरी, अमित शाहांना ब्रेक लावण्याचं काम सुरू झालेलं आहे इंटरनॅशनल फोर्सेस (International forces) ज्या आहेत, ज्यांचं या भारतावर बारीक लक्ष आहे, त्या इंटरनॅशनल फोर्सेसना नरेंद्र मोदींचं आता ओझं झालं असल्याचे राऊत यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






















