Sanjay Raut on BJP & Eknath Shinde: भाजप आपल्या स्वतःच्या नगरसेवकांवर पाळत ठेवून त्यांचे फोन टॅप करत आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केलीय. “एकनाथ शिंदे ब्लॅकमेलच्या जोरावर स्थायी समिती पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना महापौरपदापेक्षा स्थायी समितीतच अधिक रस आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Continues below advertisement

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. यावेळी त्यांना मुंबई महापौरपदासाठी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करू नका, असा आदेश भाजपच्या दिल्लीतील हायकमांडकडून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, "माझ्या माहितीप्रमाणे भाजपचा महापौरपदावरील दावा सुटणार नाही. पण अशाप्रकारे ब्लॅकमेक करून काही दुसरे पदरात पाडून घेता येईल का? असा शिंदेंचा विचार आहे. त्यांना स्थायी समिती रस असतो. जिथे पैशांचे किंवा ठेकेदारीचे घोटाळे केले जातात, तिथे या लोकांना रस आहे", असे त्यांनी म्हटले आहे.  

Sanjay Raut on BJP: भाजप स्वत:च्याच नगरसेवकांचे फोन टॅप करतंय

भाजप आणि शिंदे गटाच्या हालचालींवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर वॉचडॉग ठेवलेले आहेत. त्या त्या भागातील कार्यकर्त्यांना नगरसेवकांवर लक्ष ठेवण्यात सांगितले आहे. ते घरी असले, तरी त्यांच्या लक्ष ठेवले जात आहे. भाजपचे नगरसेवक आणि हॉटेलमध्ये असलेल्या शिंदेंच्या नगरसेवकांचे फोन टॅप केले जात आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला. रश्मी शुक्ला नसल्या, तरी प्रक्रिया तीच आहे. भाजप आपला स्वतःच्या नगरसेवकांचे फोन टॅप करत आहे, असा दावा त्यांनी केलाय.

Continues below advertisement

Sanjay Raut on Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर राऊतांचा निशाणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर देखील संजय राऊत यांनी निशाणा साधलाय. ते म्हणाले, "दावोसमध्ये गुंतवणुकीवर चर्चा कमी सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्यात मुंबईच्या महापौरपदावरच चर्चा सुरू असते. त्यामुळे यावेळेला महाराष्ट्रात गुंतवणूक कमी येणार आहे. कारण सगळ्यांची गुंतवणूक मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या संदर्भात होत आहे", असे संजय राऊत म्हणाले.

आणखी वाचा 

Raj Thackeray-Uddhav Thackeray Meet: महापालिकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे-राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र दिसणार; तारीख आणि ठिकाणही ठरलं!