Sanjay Raut on Amit Shah: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार (Central Government) आणि भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. संसदेचे कामकाज, शिवसेना पक्ष व चिन्ह सुनावणी आणि भाजपमधील अंतर्गत राजकीय घडामोडींवर त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाष्य केले. विशेषतः गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना देशाचे उपपंतप्रधान व्हायचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्याला नकार दिल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Continues below advertisement

Sanjay Raut on Amit Shah: अमित शाह अन् मोदींमध्ये मतभेद; राऊतांचा मोठा दावा

खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या संसदेतील अनुपस्थितीवर बोट ठेवताना म्हटले की, "अमित शाह यांना संसदेत येण्यापासून कोणी रोखले आहे? मुळात अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मतभेद आहेत. अमित शाह यांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचे आहे. अमित शाह यांनी मागणी केली आहे की, मला तुमचे वारसदार म्हणून, देशाचे उपपंतप्रधान म्हणून घोषित करा आणि मोदींनी त्याला नकार दिला आहे," असा मोठा दावा त्यांनी केलाय. 

Sanjay Raut: संसदेच्या कामकाजावरून भाजपवर निशाणा 

संसदेच्या कामकाजावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "सर्वच खासदारांनी सभागृहाची प्रतिष्ठा ठेवायला हवी. भाजप हा शिस्त आणि नितिमत्तेचा टेंभा मिरवणारा पक्ष आहे असे ते सांगतात, त्यामुळे शिस्त त्यांनीही पाळायला हवी. चर्चेपासून कोणीही पळत नाही, अमित शाह यांची पळापळ सुरू आहे. आकर देखो तो सही, थोडा मजा लो, हमे भी मजा लेने दो," असे त्यांनी म्हटले.

Continues below advertisement

Sanjay Raut: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर काय म्हणाले राऊत?

सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर बोलताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. "आज दुपारी 12 वाजता घटनापीठात सुनावणी होईल. ही सुनावणी कदाचित उद्यापर्यंतही जाईल. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्या कोणीही येईल आणि विधिमंडळ पक्षाचा गट विकत घेईल, त्यामुळे संविधान धोक्यात येईल. कपिल सिब्बलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयही विचारात पडले आहे. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला आहे. त्यांच्या हयातीतच हा पक्ष उद्धव ठाकरेंकडे सोपवला, तशी पक्षाची घटना अपडेट केली आणि निवडणूक आयोगाला कळवले. असे असतानाही निवडणूक आयोग म्हणते हे सगळे घटनाबाह्य आहे," असा आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, "अमित शाह यांच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करते. आधी उद्धव साहेबांचा, मग शरद पवारांचा आणि मग तृणमूल काँग्रेसचा पक्ष, यांच्यासोबतही हेच झाले. सेटिंग-बेटिंगमध्ये आतापर्यंत चार पक्ष विकले गेले, या सगळ्यामध्ये 5000 कोटींचा बाजार झाला आहे. आम्ही ठामपणे सांगतो की संविधानाचा विजय होईल आणि आमच्याच बाजूने निर्णय लागेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा 

Amit Thackeray: 'तामिळनाडूकडून धडा घ्या, महाराष्ट्र आधी, राजकारण नंतर'; 'नीट' रद्दच्या ठरावावरून अमित ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल