Sanjay Raut on Uday Samant: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे तुम्हाला लवकरच आमच्या सोबत दिसतील. आमच्या सोबत येण्याची त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे, असा दावा उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी केलाय. उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक खळबळजनक दावा केलाय.  

Sanjay Raut on Uday Samant: उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये जाणार 

संजय राऊत म्हणाले की, अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षात आहेत. त्यांनी तीन-चार पक्ष बदलले नाहीत. ते आमचे सहकारी आहेत. या दाव्यांना अर्थ नाही. स्वतः उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये चालले आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली हे तुम्हाला माहिती आहे का? असा दावा त्यांनी केला. आता संजय राऊत यांच्या दाव्यावर उदय सामंत काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Sanjay Raut on Shiv Sena Shinde Faction: शिंदे गटाला मोदी, शाह हेच वंदनीय

दरम्यान, मुंबईतील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आज कोकण भवनात जाणार आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे वंदनीय आहेत. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. पण, शिंदे गटाकडून निषेधाचा एक शब्द नाही. शिंदे सेनेला बाळासाहेब वंदनीय नाही. शिंदेंची शिवसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे. किती दिवस रुसून बसणार असा सवाल त्यांनी केला. फारतर एखादी साडीचोळी पदरात पाडून घेतली, असा टोला राऊतांनी शिंदे गटाला लगावला. तर मुंबईचा महापौर हा भाजपचा होईल, असा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय.  

Sanjay Raut on Girish Mahajan: महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर...

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्या विषयावर पडदा पडला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये महिलेने निषेध व्यक्त केला, त्या महिलेचे मी कौतुक करतो. पण, आता मंत्र्यांनी माफी मागितली आहे. नाक घासलेलं आहे. आता फार विषय ताणू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

आणखी वाचा 

Girish Mahajan and Vijay Wadettiwar: बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला लाज वाटते तर तुम्हाला देशात राहण्याचा अधिकार आहे का? वडेट्टीवार गिरीश महाजनांवर संतापले