Sanjay Raut: अहिल्यानगर महापालिकेतील 400 कोटींच्या रस्त्यांच्या घोटाळ्याला राजकीय संरक्षण; खासदार संजय राऊत यांचा आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
Sanjay Raut : अहिल्यानगर महापालिकेतील 776 रस्त्यांच्या कामात सुमारे 350 ते 400 कोटीहून अधिक रकमेचा घोटाळ्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Ahilyanagar News : अहिल्यानगर महापालिकेतील (Ahilyanagar Municipal Corporation) 776 रस्त्यांच्या कामात सुमारे 350 ते 400 कोटीहून अधिक रकमेचा घोटाळ्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी खासदार राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत या प्रकरणावर प्रकाश टाकला आहे. महापालिकेतील प्रशासक आणि अधिकारी संगनमताने महाराष्ट्रातील तिजोरीची लूट करत असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या पत्रात लिहिलं आहे.
दरम्यान, सत्ताधारी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या वरदहस्ताने आणि संगनमताने अहिल्यानगर शहरातील 2016 ते 2020 दरम्यान सुमारे 776 रस्त्यांचा 350 ते 400 कोटीचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रात केला आहे. हा भ्रष्टाचार अहिल्यानगर शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी पुराव्यानिशी समोर आणल्याचाही राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच याबाबत तक्रार महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. शिवाय त्यानंतर 2020 ते 2023 या वर्षात सुद्धा अशाच कार्य प्रणालीनुसार 200 ते 300 कोटींचा घोटाळा झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्याची चौकशी करून दोषींना तातडीने अटक करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मा.मुख्यमंत्री
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 16, 2025
महानगर पालिकांवर सध्या प्रशासकांचे राज्य असले तरी अहिल्यानगर सारख्या पालीकेत लोकप्रतिनिधी,अधिकारी ठेकेदार मिळून पालिक लुटून खात आहेत,त्यामुळे रस्ते आरोग्य या सारख्या सुविधा देखील जनतेला मिळत नाहीत,
अहिल्यानगर बाबत पुढील पत्रावर कारवाई व्हावी
@Dev_Fadnavis pic.twitter.com/DV1bDvtVNe
महानगर पालिकांवर सध्या प्रशासकांचे राज्य असले तरी अहिल्यानगर सारख्या पालीकेत लोकप्रतिनिधी, अधिकारी ठेकेदार मिळून पालिक लुटून खात आहेत, त्यामुळे रस्ते, आरोग्य या सारख्या सुविधा देखील जनतेला मिळत नाहीत. परिणामी अहिल्यानगर बाबत पुढील पत्रावर कारवाई व्हावी, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या


















