Sangli Satara Vidhan Parishad सातारा: सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी शिवसेनेचे नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची निवडणुकीच्या अनुषंगाने भेट घेतली. या भेटीदरम्यान निवडणुकीच्या रणनीतीबाबत दोन्ही नेत्या मध्ये चर्चा झाली.या महत्त्वपूर्ण भेटीनंतर विशेष म्हणजे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि धैर्यशील कदम हे दोन्ही नेते एकाच गाडीतून सांगलीकडे रवाना झाले.
शंभूराज देसाई-धैर्यशील कदम भेट
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बंडखोरी बाबत प्रतिक्रिया दिली आहे. "सांगली जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार महायुतीत 'युतीधर्म' पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून, बंडखोरी रोखण्यासाठी आणि अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी आम्ही स्वतः सांगलीला निघालो असल्याचे ते म्हणाले."
सांगलीत तानाजीराव पाटील, आमदार सुहास बाबर आणि इतर स्थानिक नेत्यांशी चर्चा करून बंडखोर अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिवसेनेकडून युतीधर्माचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी ग्वाहीही शंभूराज देसाई यांनी दिली.
साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकी नंतर महायुतीमध्ये अंतर्गत नाराजीबाबत विचारलं असता पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आधी सांगलीचा हा पहिला टप्पा आणि अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. त्यानंतर महायुतीचे सर्व प्रमुख नेते एकत्र बसून साताऱ्याच्या जागेबाबत सविस्तर चर्चा करू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला भेटीनंतर अर्ज माघारी घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी शंभूराज देसाई यांच्या गाडीत उमेदवार धैर्यशील कदम एकत्र सांगलीला रवाना झाले आहेत. शंभूराज देसाई सांगलीमध्ये बंडखोरी करत शिवसेनेने भरलेल्या अर्जाविषयी तानाजीराव पाटील आणि सुहास बाबर यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.
शंभूराज देसाई आणि धैर्यशील कदम एकाच वाहनातून सांगलीला
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून, दोघेही एकाच वाहनातून सांगलीकडे रवाना झाले आहेत. तानाजी पाटील यांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. यामध्येच धैर्यशील कदम आणि पालकमंत्री शंभूराजे यांची एकाच गाडीतून प्रवासामध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई कशा पद्धतीने शिवसेनेचे बंडखोर उमेदवार तानाजी पाटील यांची मनधरणी करण्यात महत्वाचं ठरणार आहे.
