सांगली : राज्यातील जिल्हा बँकांच्या निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू झाली असून सांगली जिल्ह्यात बँकेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जही दाखल केले जात आहेत. काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता सांगली (sangli) जिल्हा बँकेसाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनीही रणशिंग फुंकले आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमदेवारी अर्ज दाखल केला. यावेळी, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

Continues below advertisement

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली आहे. मात्र, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी गोपीचंद पडळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. विशेष म्हणजे गोपीचंद पडळकरांचा अर्ज भरतेवेळी, निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गदारोळ पाहायला मिळाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरच जयंत पाटलांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जयंत पाटलाचा बाप आला... अशा घोषणा दिल्याने येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा थेट जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचं दिसून येत आहे. जयंत पाटलांच्या विरोधातील या घोषणाबाजीमुळे आगामी संघर्षाची चाहूल सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. 

दरम्यान, ही शेतकऱ्याची बँक आहे, या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं ही आमची भावना आहे. शेतकऱ्यांचा पाठिंबा घेऊनच मी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. आज सदाभाऊंच्या चार ते पाच, आणखी दोन चार असे बरेच अर्ज आम्ही सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकांसाठी दाखल करत आहोत, असेही गोपीचंद पडळकर यांनी यावेळी बोलताना म्हटले. 

Continues below advertisement

खासदार पाटील, विश्वजीत कदमांचेही अर्ज

सांगली जिल्हा बँकांच्या निवडणुकीत चांगलीच चूरस पाहायला मिळणार आहे. कारण, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दोन मित्रांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली. विशेष म्हणजे, विशाल पाटील आणि त्यांच्या पत्नी पूजा पाटील या दोघांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. तर, काँग्रेस आमदार आणि माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी देखील प्रथमच जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी अर्ज भरलेला आहे.

हेही वाचा

आईनं सोनं गहाण ठेऊन धनुष्यबाण घेऊन दिला; लेकानं गोल्ड जिंकत सुवर्णक्षण कमावला, वडिलांना आनंदाश्रू