Sandeep Joshi: पुण्यात विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला अतिशय निंदनीय आहे. मात्र डीजेचा विरोध सिलेक्टिव्ह असू शकत नाही. तो फक्त बाप्पांच्या उत्सवापुरता नव्हे, तर सर्वधर्मीय सण उत्सवांसाठी बद्दलही हवा. दुर्दैवाने पुण्यातला विरोध सिलेक्टिव्ह वाटत होता. अशीप्रतिक्रिया नागपूरचे माजी भाजप आमदार संदीप जोशी (Sandeep Joshi on Vidyanand Bapat) यांनीदिलीआहे. विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांच्यावर झालेला हल्ला अतिशय निंदनीय आहे. पुणे पोलिसांनी तातडीने हल्ला करणाऱ्यावर ठोस कारवाई करावी, अशी मागणीही नागपुरात डीजे विरोधात आवाज उचलणाऱ्या संदीप जोशी यांनी केली आहे. (Sandeep Joshi on Vidyanand Bapat Pune Marathi New) 

Continues below advertisement

Sandeep Joshi: पुण्यात डीजेला केला जाणारा विरोध सर्वधर्मीय सणउत्सवांसाठी सारखेपणाने व्हायला हवा,

दरम्यान, पुण्यात डीजेला केला जाणारा विरोध सर्वधर्मीय सणउत्सवांसाठी सारखेपणाने व्हायला हवा, डीजेला केला जाणारा विरोध सिलेक्टिव्ह असू शकत नाही, असेही जोशी म्हणाले. दुर्दैवाने पुण्यात बापट यांचा डीजे संदर्भातला विरोध फक्त गणपती बाप्पांच्या उत्सवापूरता आहे की काय असा समज निर्माण होत होता, असे सूचक वक्तव्यही जोशी यांनी केले आहे. बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर डीजे विरोधातली मोहीम आणखी तीव्र होईल. आजवर डीजे विरोधात ठाम भूमिका न घेणारे आणि कुंपणावर बसलेले अनेक लोकं आता डीजेच्या विरोधात उघडपणे येतील, असेही संदीप जोशी म्हणाले.

Continues below advertisement

Sandeep Joshi: नागपुरात डीजे विरोधातली मोहीम तीव्रतेने चालवू. काहीही झाले तरी सुरक्षा घेणार नाही.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असता, सर्वत्र गणपती (Ganeshotsav) बाप्पांच्या आगमनाची आणि 10 दिवसांच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, यंदा गणेशोत्सव गाजतोय तो डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी. पुणे महापालिकेच्या गणेशोत्सव पूर्व बैठकीत नागरिकांची बाजू मांडताना नारायण पेठेतील रहिवाशी असलेल्या विद्यानंद बापट यांनी डिजेमुक्त आणि ध्वनीप्रदुषणमुक्त गणेशोत्सवाचा मुद्दा उचलून धरला. बापट यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर, अनेकांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला असून आता पुण्यातत्यांच्यावरएकातरुणानेहल्लाकेल्याचाप्रकारघडलाआहे. त्याचेपडसादआताराज्याचेराजकारणावरहीउमटतानादिसतआहे. तरदुसरीकडे डिजेमुक्त आणि ध्वनीप्रदुषणमुक्त गणेशोत्सवाचा मुद्दा नागपूरातही (Nagpur) जोर धरत आहेत. नागपूरचे माजी आमदार संदीप जोशींनी यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, नागपुरात डीजे विरोधातली मोहीम तीव्रतेने चालवू. काहीही झाले तरी सुरक्षा घेणार नाही. ज्यांचा आमच्या भूमिकेशी मतांतर आहे, त्यांनी येऊन आमच्याशी खुली चर्चा करावी, असे आवाहनही संदीप जोशी यांनी केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या