एक्स्प्लोर

Sanjay Raut vs Sandeep Deshpande: चंद्रपूर प्रकरणावर संदीप देशपांडेंकडून थेट संजय राऊतांना लक्ष्य; कारण काय?, जाणून घ्या, 'राज'कारण!

Sanjay Raut vs Sandeep Deshpande: कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेने ठाकरेंची शिवसेना एकत्र निवडणूक लढवल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला बाजूला करून मनसेच्या पाच नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

Sanjay Raut vs Sandeep Deshpande: चंद्रपूर महापौर निवडणुकीमध्ये (Chandrapur Mahanagarpalika) ज्या प्रकारे ठाकरे शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला आणि काँग्रेसला बाजूला करत भाजपचा महापौर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा उपमहापौर चंद्रपूर महापालिका मध्ये बसवला त्यानंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चांगली जुंपलेली पाहायला मिळत आहे. जे आम्ही कल्याण डोंबिवली मध्ये केलं त्यावेळी आमच्यावर टीका केली मात्र तुम्ही जे चंद्रपूरमध्ये केलं त्याचं काय? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट संजय राऊत यांना विचारला. त्यामुळे संजय राऊतांवर (Sanjay Raut) थेटपणे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) एवढी टीका का करत आहेत?, यामागचं कारण जाणून घ्या...

कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेने ठाकरेंची शिवसेना एकत्र निवडणूक लढवल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला बाजूला करून मनसेच्या पाच नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेला जिव्हारी लागला. मनसेच्या या निर्णयावर संजय राऊत यांनी थेटपणे टीका करत कल्याण डोंबिवली स्थानिक नेते राजू पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटलं. अप्रत्यक्षपणे त्यांनी संदीप देशपांडे हे सुद्धा या निर्णय प्रक्रियेत असल्याचे सांगत मनसेनं हा निर्णय घेतल्याचं त्यावेळी म्हटलं. राज ठाकरेंची इच्छा नसताना सुद्धा हा निर्णय घेण्यास स्थानिक नेत्यांनी भाग पाडलं असेही संजय राऊतानी त्यावेळी टीका करताना म्हटलं.

संदीप देशपांडेंची संजय राऊतांवर थेट टीका- (Sanjay Raut vs Sandeep Deshpande)

कल्याण डोंबिवली निर्णयामध्ये मनसेला एक प्रकारे टारगेट करत असताना संजय राऊत यांनी मनसेच्या नेत्यांना टार्गेट केलं. अगदी उलटा प्रकार जेव्हा चंद्रपूर मध्ये घडला आणि ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेसला सोडून भाजपला पाठिंबा दिला. तेव्हा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेटपणे संजय राऊतांवर टीका करायला सुरुवात केली... कल्याण डोंबिवली मध्ये जे आम्ही केलं तेच तुम्ही चंद्रपूर मध्ये केलं. "तुमने किया तो रासलीला और हमने किया तो कॅरेक्टर ढिला" असं म्हणत सडकून टीका संजय राऊतांवर केली.

कल्याण-डोंबिवली आणि चंद्रपूरमध्ये अंतर्गत राजकीय समीकरण जुळून आणण्यासाठी नेमका प्रकार काय घडला हे एकदा जाणून घेऊ? (KDMC And Chandrapur Municipal Corporation)

  1. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सोडून शिंदे शिवसेनेसोबत जाण्यासाठी मनसेच्या नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत प्राथमिक बैठका केल्या ज्यामध्ये संदीप देशपांडे आणि राजू पाटील उपस्थित असल्याची माहिती आहे. 
  2. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे पक्षाने शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिला नसता तर त्यांचे निवडून आलेले पाच नगरसेवक हे पक्षाला सोडून गेले असते आणि पक्षाचा अस्तित्व उरलं नसतं आणि त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागणार असं या नेत्यांनी मनसे अध्यक्षांना सांगितल्याची माहिती आहे. 
  3. त्यामुळे या निर्णयाचा राग ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना आला होता आणि त्यामध्ये संजय राऊत यांनी मनसे नेत्यांवर सडकून टीका केली होती. 
  4. चंद्रपूर महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळी ठाकरे यांच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसचा पर्याय  निवडण्या ऐवजी भाजप सोबत जाण्याचा पर्याय निवडला आणि महापौर पदाची आणि उपमहापौर पदाची ऑफर स्वीकारली.
  5. अगदी जे कल्याण डोंबिवली मध्ये मनसेने केलं तेच चंद्रपूर मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने केलं. यामध्ये संजय राऊत यांचा या निर्णयाला विरोध असल्याचा त्यांनी वारंवार सांगितलं. मात्र तरीसुद्धा चंद्रपूर मध्ये भाजपला पाठिंबा देण्यात आला. 
  6. कल्याण डोंबिवली मध्ये संजय राऊत यांनी जी टीका केली त्याचा राग मनसे नेत्यांना होता कारण कल्याण डोंबिवलीच्या प्रकरणांमध्ये एक प्रकारे मनसेच्या नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभ केल्यासारखा केलं त्यामुळे आता हीच संधी मनसे नेत्यांकडे चालून आली आणि यामध्ये संदीप देशपांडे ही संधी न सोडता थेट संजय राऊतांवर टीका करत आहेत.

दोन्ही निर्णयात पक्षीय स्वार्थ? (Shivsena UBT-MNS)

ठाकरे बंधूंची युती महापालिका निवडणुकीत असताना कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने घेतलेला निर्णय आणि चंद्रपूर मध्ये काँग्रेसला सोडून ठाकरेंच्या शिवसेनेने घेतलेला निर्णय हे दोन्ही निर्णय राज्याच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय बनले. मात्र याच निर्णयावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि मनसेकडून तेवढेच तिखट उत्तर देत एकमेकांवर टीका करण्यात आली. मात्र कारवाई आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यावर कुठेही झाली नाही. त्यामुळे या दोन्ही निर्णयात पक्षीय स्वार्थ लपला होता का?, अशी चर्चा आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Sanjay Raut Chandrapur Mahanagarpalika Politics: चंद्रपुरात शेण खाणाऱ्यांवर कारवाई होणार, संजय राऊतांची माहिती; संदीप देशपांडेंना म्हणाले, 20 टक्के कमिशन होतं का?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Embed widget