एक्स्प्लोर

Sameer Bhujbal: भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण.....,समीर भुजबळांचा गौप्यस्फोट

Sameer Bhujbal: मी नाराज नाही, मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिपदाबाबत चर्चा झाली. मात्र, मंत्रिपदाच्या शपथेसाठी वेळ अतिशय कमी होता त्यामुळे शपथविधी पार पडला नाही.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आपल्याला मिळावी आणि पुतण्या समीर भुजबळांना मंत्रि‍पदाची संधी देण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली होती. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांचा हा प्रस्ताव मान्य न केल्याने अखेर राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीने राज्यसभा खासदारकीची संदी दिली. राजेंद्र जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आपल्याला संधी न मिळाल्याने छगन भुजबळांची नाराजी उघड झाली. जो न्याय इतर नेत्यांच्या मुला-बाळांना लागू तोच मलाही मिळायला हवा, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. आता, समीर भुजबळ यांनी देखील राज्यसभा आणि मंत्रिपदासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. 

मी नाराज नाही, मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिपदाबाबत चर्चा झाली. मात्र, मंत्रिपदाच्या शपथेसाठी वेळ अतिशय कमी होता त्यामुळे शपथविधी पार पडला नाही. भाजपकडून शब्द देण्यात आला आहे, ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल किंवा मंत्रिमंडळ फेरबदल होईल त्यावेळी मला नक्की संधी मिळेल, असे म्हणत राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडीतील इनसाईड स्टोरीच समीर भुजबळ यांनी सांगितली. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने प्रफुल पटेल यांचे निकटवर्ती असलेल्या राजेंद्र जैन यांना संधी दिली असून विधानपरिषद निवडणुकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना बिनविरोध निवडून आणले आहे. त्यामुळे, समीर भुजबळ यांच्या मंत्रिपदासाठी छगन भुजबळ आग्रही होते. मात्र, त्यांची मागणी सध्यातरी वेटींगवर असल्याचं दिसून येतं. 

25 वर्षांपासून पक्षासाठी काम - समीर भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांची संसदेत काम करण्याची इच्छा आहे. यापूर्वी 2 ते 3 वेळा संधी देखील चालून आली होती. मात्र, काही कारणास्तव ते होऊ शकलं नाही. त्यामुळे, माझा राज्यसभेवर जाण्याच विषय नव्हता. मी लहानपणापासून राजकारणात काम करत आहे. आधी शिवसैनिक म्हणून काम केलं. साहेबांसोबत राष्ट्रवादीत आलो, त्यानंतर 1999 सालापासून राजकारणात काम करत आहे. पक्षाचा झेंडा बनवणे, चिन्ह ठरवणे, क्षण्मुखानंद आणि दादर शिवाजी पार्क मैदानातील सभांचं आयोजन करणे, राज्यात सभा नियोजन करणे अशी सगळी कामे करत आलो आहे. आज 25 वर्षापेक्षा जास्त काळ राष्ट्रवादी सोबत काम करत आहे. त्यामुळे मला संधी मिळायला काहीच अडचण नाही, अशी भूमिका समीर भुजबळ यांनी मांडली. तसेच, भविष्यात मंत्रि‍पदाचा शब्द देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. 

हेही वाचा

15 दिवसांत माफी मागा, अन्यथा...; आमदार संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, वाद चिघळला

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सांगलीत शरद पवार गटाला मोठा धक्का, ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं प्रकरण काय?
सांगलीत शरद पवार गटाला मोठा धक्का, ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं प्रकरण काय?
देवेंद्र फडणवीस हेच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, संजय राऊतांना लगावला टोला
देवेंद्र फडणवीस हेच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, संजय राऊतांनां लगावला टोला
Thane District Central Co-Operative Bank Ltd Election 2026: ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे-चव्हणांच्या राजकीय चाणक्यनीतीचा करिष्मा; महायुतीचा दणदणीत विजय 
ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे-चव्हणांच्या राजकीय चाणक्यनीतीचा करिष्मा; महायुतीचा दणदणीत विजय 
Supriya Sule: 'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, 'आता राष्ट्रवादीचे खासदार...'
'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, 'आता राष्ट्रवादीचे खासदार...'
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Embed widget