Sambhajiraje Chhatrapati on Ashok Kharat Case:  भारतीय लष्करातील 'कॅप्टन' हे अत्यंत सन्मानाचे पद आहे. या पदापर्यंत पोहोचणारा व्यक्ती अतिशय मेहनतीने, जिद्दीने व प्रखर राष्ट्रभक्तीने इथेपर्यंत पोहोचत असतो. भारतीय सेनादलांत या पदावर सेवा बजावणाऱ्या किंवा या पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तींनाचा नावासोबत 'कॅप्टन' हे पद जोडण्याचा अधिकार असतो. सर्व जनतेला आणि विशेषत: माध्यमांना माझी विनंती आहे की, घृणास्पद कृत्ये करणाऱ्या भोंदूच्या नावापुढे कुठेही हे पद लावू नये. असेम्हणत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी संतप्त प्रतिक्रिया देतपुन्हाभाष्यकेलं आहे.

Sambhajiraje Chhatrapati : नकळत आपल्या सैन्यदलांचा अपमान करू नये.

हा भोंदूबाबा कधीही आपल्या सैन्यदलात अथवा नौदलात नव्हता. कधीकाळी व्यावसायिक व्यापारी जहाजांवर कर्मचारी असलेला हा व्यक्ती स्वयंघोषित कॅप्टन आहे. त्याने स्वतःला लावून घेतलेली खोटी पदवी आपण संमत करून नकळत आपल्या सैन्यदलांचा अपमान करू नये. असेही संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्यासोशलमीडियावरीलपोस्टमध्येम्हटलंआहे.

Sambhajiraje Chhatrapati on Ashok Kharat Case: त्यांच्या अंगातली मस्ती जिरवण्याची हीच वेळ

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात असे प्रकार घडतात हे आश्चर्यकारक आहे. जे काही त्यांच्यावर आरोप झाले, ज्या माध्यमातून त्यांना अटक केली. निंदनीय असे प्रकार महाराष्ट्रात घडतात.  या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्यामागे कोण आहे? कोण-कोण त्या महाराजांकडे जात होतं, या सगळ्याचा तपास केला पाहिजे. अशा महाराजांना महाराष्ट्रात ठेवू नये. त्यांच्या अंगातली मस्ती जिरवण्याची हीच वेळ आहे. हे प्रकार परत घडू नये, कोणी धाडस करू नये म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, कारवाई करावी. महिलांना संरक्षण दिले पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षाच त्यांच्याशी संबंधित आहेत. त्यांना पदावरून काढले पाहिजे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.  

नेमकं प्रकरण काय? (Nashik Ashok Kharat Case)

अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.