एक्स्प्लोर

Harshvardhan Sapkal: ‘हर्षवर्धन सपकाळ सोलापुरात आल्यास आम्ही त्यांचा चौरंग करू', सकल हिंदू समाजाचा थेट इशारा

Harshvardhan Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात सोलापुरात सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे.

Harshvardhan Sapkal : सोलापुरात (Solapur) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या वक्तव्याविरोधात सकल हिंदू समाज (Sakal Hindu Samaj) आक्रमक झाला आहे. जिल्हापरिषद कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. “हर्षवर्धन सपकाळ सोलापुरात आल्यास आम्ही त्यांचा चौरंग करू,” असा थेट इशारा कार्यकर्त्यांनी दिल्याने वातावरण तापले आहे.

Tipu Sultan Controversy: वादाची ठिणगी कशी पडली?

मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावण्यात आला होता. हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर तो फोटो हटवण्यात आला. यानंतर सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला नवे वळण मिळाले. सपकाळ यांनी “टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या समकक्ष पाहिले पाहिजे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केलं, असं सपकाळ म्हणाले होते. या विधानावरून राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सपकाळ यांच्या वक्तव्याचा भाजप आणि शिवसेनेने तीव्र समाचार घेतला होता.

Sakal Hindu Samaj: सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका 

आता सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्याविरोधात घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला. “हर्षवर्धन सपकाळ सोलापुरात आल्यास आम्ही त्यांचा चौरंग करू,” असा थेट इशारा कार्यकर्त्यांनी दिल्याने वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर सकल हिंदू समाजाचे आंदोलन सुरु असताना काही कार्यकर्त्यांनी पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केले. मात्र, पुतळा आंदोलनस्थळी आणण्यापूर्वीच पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतल्याचे पाहायला मिळाले.

Harshvardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ मालेगावात आंदोलन

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतानाच्या तुलनेबाबत वक्तव्याच्या निषेधार्थ मालेगावात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ व टिपू सुलतानाच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. उपमहापौर दालनात पुन्हा फोटो लागल्यास तो फोटो काढून फेकण्यात येईल, असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आलाय. यावेळी मोसम पूल येथून मोर्चा काढत छावणी पोलिस ठाणे यांना निवेदन देण्यात आले. 

आणखी वाचा 

Malegaon News : टिपू सुलतान यांच्या सैन्यात अनेक प्रमुख हे ब्राह्मण, संविधानात ज्यांचा फोटो तो हटविण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला? मालेगावच्या उपमहापौर पुन्हा कडाडल्या

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget