एक्स्प्लोर

sahyadri karkhana Election: चार महिन्यांपूर्वी जिंकलेल्या भाजप आमदाराला बॅलेट पेपरवरच्या निवडणुकीत निम्मी मतंही मिळवता आली नाहीत; रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

sahyadri karkhana Election: सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानंतर पराभवानं खचून जायचं नसतं. विजय झाला तर विजय पचवता आला पाहिजे, असं बाळासाहेब पाटील म्हणाले.

मुंबई: साताऱ्याच्या कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला भरघोस यश मिळाले. बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या  21 जागांवर विजय मिळवला आहे. बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या नेतृत्त्वातील पी.डी. पाटील पॅनेलचे सर्व उमेदवार 7500 ते 8000 हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. या विजयानंतर कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. (sahyadri karkhana Election)

25 वर्षानंतर पार पडलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत भरघोस यश प्राप्त केल्यानंतर बाळासाहेब पाटील यांना शरद पवार आणि जयंत पाटील यांचा फोन आला होता. शरद पवार यांच्याकडून बाळासाहेब पाटील यांचे कारखान्याच्या निवडणुकीत संपूर्ण पॅनेल निवडून आणल्या निमित्त विशेष कौतुक केले. विधानसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या पहिल्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याच सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीकडे लक्ष लागले होते. यंदा निवडणुकीत भाजप आमदार मनोज घोरपडे, भाजप जिलाध्यक्ष धैर्यशील कदम आणि बाळासाहेब पाटील या तीन नेत्यांमधे तिरंगी लढत पार पडली होती.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातील निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सत्ताधारी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनेलने 4000 मतांची आघाडी घेतली होती. अनेक तास मतमोजणी सुरु होती. पहिल्या फेरीपासूनच सत्ताधारी गटाचा विजय निश्चित झाला असून सत्ताधारी गटाकडून जल्लोष सुरू झाला होता. भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे. पहिल्या फेरीत सर्वच्या सर्व 21 जागांवर सत्ताधारी गट 4 हजाराहून अधिक मतांनी पुढे होता. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली होती.

रोहिणी खडसेंचा भाजपला टोला

सह्याद्री साखर कारखान्यातील निवडणुकीत भाजप नेत्यांच्या पॅनलचा धुव्वा उडाल्यानंतर रोहिणी खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी म्हटले की, 4 महिन्यांपूर्वी 50 हजार मताधिक्याने जिंकलेला भाजप पार्टीचा एक आमदार, बॅलेट पेपर वर घेतलेल्या 'सहयाद्री कारखाना' निवडणूकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही. पैशाचा वारेमाप वाटप करुन देखील.....,असे रोहिणी खडसे यांनी म्हटले. यावर आता भाजपच्या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा जिल्ह्यातील कराड, कोरेगाव, सातारा, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा पाच तालुक्यात आहे. कारखान्याच्या एकूण 32 हजार 205 सभासदांपैकी 26,081 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सत्ताधारी पी डी पाटील पॅनलला तब्बल 15 हजाराहून अधिक मते मिळाली.

तर भाजप आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटील यांच्या पॅनेलला 7000 ते 8000 दरम्यान मते मिळाली. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ आणि काँग्रेसचे निवास थोरात यांच्या तिसऱ्या पॅनेलला 2200 ते 2300 मते मिळाली.

आणखी वाचा

सह्याद्री साखर कारखान्यावर बाळासाहेब पाटलांचा झेंडा, पी.डी. पाटील पॅनलचा 21-0 असा दणदणीत विजय, भाजप नेत्यांच्या दोन्ही पॅनलचा पराभव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prajakt Tanpure :  प्राजक्त तनपुरेंची राहुरीच्या पोटनिवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा उल्लेख अन् मुख्यमंत्र्यांचं कौतुक,राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
प्राजक्त तनपुरेंकडून पोटनिवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांचा उल्लेख आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
Baramati : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट, नेमकं काय घडलं?
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget