एक्स्प्लोर

Sahar Shaikh Mumbra AIMIM: कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; निवडणूक लढवताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल, नेमकं प्रकरण काय?

Sahar Shaikh Mumbra AIMIM: एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आलं आहे.

Sahar Shaikh Mumbra AIMIM: राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीत पार पडल्या. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 सर्वाधिक चर्चेत राहिला. या प्रभागातून एमआयएमच्या उमेदवार सहर शेख (Sahar Shaikh) यांनी विजय मिळवत राजकारणात जोरदार एन्ट्री केली. पालिकेच्या निवडणुकीनंतर सहर शेख यांच्या कैसा हराया...या डायलॉगची ठाणे, मुंबईसह राज्यभर चर्चा रंगली होती. आता याच सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आलं आहे. (Sahar Shaikh AIMIM)

एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळविल्याची तक्रार करण्यात आली आहे. सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले. निवडणूक लढविताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली. सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. (Sahar Shaikh AIMIM)

नेमकं प्रकरण काय? (Sahar Shaikh Mumbra AIMIM)

ठाणे महापालिकेच्या एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून बोगस जात प्रमाणपत्र  दाखला सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. सहर शेख यांनी बनावट कागदपत्राचे आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रारदाराची मागणी आहे. सहर शेखकडून यंत्रणांची दिशाभूल केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. 

उत्तर प्रदेशातील गाजियाबादची मूळ रहिवासी युनूस इक्बाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवला. त्यांची मुलगी सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले आणि त्यानंतर ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झाल्या. 

नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळवला- (AIMIM Corporator Sahar Shaikh)

 ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दिकी अहमद यांनी सहर शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती. युनूस यांनी स्थलांतरितांना नमुना 10 लागू असताना नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल  करत बनावट दाखला मिळवला. त्या आधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी सिद्धीकी अहमद यांनी केली आहे. ठाणे तहसीलदारांना प्राप्त तक्रारीनुसार 18 मार्च रोजी घेतलेल्या सुनावणीस आजाराचे कारण देत युनूस गैरहजर होते सुनावणीस उपस्थित असलेल्या त्यांच्या वकिलांनी जात दाखल्याची कलर प्रिंट व काही कागदपत्र सादर केले. 23 मार्चला पुन्हा सुनावणी घेण्यात आली तेव्हा ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात प्रमाणपत्र दाखल्यामधील त्रुटी काढल्या. तर ठाण्याच्या रहिवासी असलेल्या सहर शेख ने  मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली जात आहे. यासंदर्भात सहर शेख आणि तिच्या वडिलांना एबीपी माझा ने संपर्क केला असता अध्याप संपर्क होऊ शकला नाही. (Sahar Shaikh AIMIM)

कोण आहेत सहर शेख? (Who Is Sahar Shaikh?)

सहर शेख सध्या ठाणे महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेविका आहेत. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत सहर शेख ठाण्यातील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झाल्या होत्या. निवडणुकीवेळी सहर शेख आणि तिचे वडील युनूस शेख यांनी मुंब्रातील शरद पवार गटाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना अंगावर घेत जोरदार टीका केली होती. 

सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता, VIDEO:

संबंधित बातमी:

Sahar Shaikh MIM TMC Election 2026: आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
West Bengal : महिलांना 3000 रुपये महिना, बसचा प्रवास मोफत, सातवा वेतन आयोग गठीत; बंगालच्या कॅबिनेटमध्ये धडाधड निर्णय
महिलांना 3000 रुपये महिना, बसचा प्रवास मोफत, सातवा वेतन आयोग गठीत; बंगालच्या कॅबिनेटमध्ये धडाधड निर्णय
Vidhan Parishad MLA Attandance: विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
Mumbai News: BMC मधील 79 नगरसेवकांवर टांगती तलवार, निवडीविरोधात याचिका दाखल, कुणाकुणाची नावं?, यादी समोर
BMC मधील 79 नगरसेवकांवर टांगती तलवार, निवडीविरोधात याचिका दाखल, कुणाकुणाची नावं?, यादी समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
Vidhan Parishad MLA Attandance: विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
Gold Price: आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
Gold Import: सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
Embed widget