Maharashtra Budget Session 2026 : मुंबईतसध्यामहाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरुआहे. अशातचहे अधिवेशन दिवंगत उपमुख्यमंत्रीअजितपवारांच्याविमान अपघातासंदर्भातीलसंशयआणिइतरअनेकमुद्द्यावरूनवादळीठरलंआहे. अशातचआता भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्यणाशेट्टी (Sachin Kalyanshetti) आणि शिवसेना उबाठा गटाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचेबघायलामिळालेआहे. विधीमंडळ परिसरातचदोनआमदारांची बाचाबाची झालीय. विधानसभा परिसरातील पोर्च मध्येच हावादझालाय. जेष्ठआमदार भास्कर जाधव यांचीयावेळी बोलताना जीभ घसरल्याचंबोललंजातआहे. तरबापाचा उल्लेख केल्याने आमदार जाधव विरोधात सचिन कल्यणाशेट्टी यांनीजाबविचारातही शाब्दिक वादरंगल्याचीमाहितीआहे. (Sachin Kalyanshetti vs Bhaskar Jadhav)
माझाबापकाढायचाअधिकारतुम्हालाआहे? (Vidhan Bhavan Rada)
मिळालेल्यामाहितीनुसार, तुम्हीबाप काढलाय, बापकाढायचाअधिकारतुम्हालाआहेका? तुम्हीजेष्ठसदस्यआहे. तुम्हीबापकाढलातरमीहीकाढेल. असंम्हणत सचिन कल्यणाशेट्टी यांनीभास्करजाधवांनाजाबविचारलाय. तरयावर आमदार भास्कर जाधवांनीप्रतिसाददेतांनाम्हटलंकितुम्हालामाझाबापकाढायचाअसेलतरकाढा, असंम्हटलंय.
वादाचंनेमकंकारणकाय? (Sachin Kalyanshetti vs Bhaskar Jadhav)
विधानसभा आमदार राहुल आवाडे यांची मुलगी सानिका आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे चिरंजीव अजय यांचा विवाह सोहळा 15 मार्च रोजी पार पडणार आहे. त्या अनुषंगाने एकाच ठिकाणी सोईस्कर होईल म्हणून आमदारांच्या खासगी सहाय्यकांकडून लग्नपत्रिकेचे वाटप केले जात होते, त्यावरुन हा वाद झाला. अशातच, विधीमंडळ आवारात पत्रिका वाटत असल्याने भास्कर जाधवांकडून जहरी टीका करण्यात आली. जाधवांनी सरकारचा बाप काढल्याने भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी भडकलेत. यावर काही हरकत असेल तर तक्रार करा, बाप काढायचा अधिकार कुणी दिला म्हणत कल्याण शेट्टी आक्रमक झालेआणि सचिन कल्याण शेट्टी यांनी भास्कर जाधवांना धारेवर धरले. या वादामुळेपरिसरातकाहीकाळएकचगोंधळझाल्याचेबघायलामिळालंय.
Sachin Kalyanshetti : कोणाचा किंवा सरकारचा बाप काढणं योग्य नाही
दरम्यान, यासर्वप्रकारावर सचिन कल्यणाशेट्टी यांनीप्रतिक्रियादेतानासांगितलंकि, भास्कर जाधव कर्मचाऱ्यांना रागवत होते. मी सभागृहात प्रवेश करत होतो, तेव्हा ते सरकारचा बाप काढत होते. अपशब्द ते वापरत होते, ते माझ्या कानावर पडलं. यासंदर्भात मीत्यांना तक्रार करा, असं सांगत होतो. बाहेर आल्यावर काय बोलावं हे सांगत होतो. इथे परिवार म्हणून राहातो, लग्न पत्रिका एकमेकांना देतच असतो ना, म्हणून काय कोणाचा किंवा सरकारचा बाप काढणं योग्य नाही. त्यांना समजावून सांगत होतो, मात्र त्यांना कळत नव्हतं. विरोधी पक्षनेतेपद मिळतनाही, म्हणून ते असे वागत असावे. मूळात हे वागणं चुकीचं होतं, सरकारचा बाप काढणं योग्य नव्हतं, असेही सचिन कल्यणाशेट्टी म्हणाले.
इतरमहत्वाच्याबातम्या
