Sachin Ahir on Aditya Thackeray : माझाअनुभव काहीसावेगळाआहे. मात्रएकगोष्टस्पष्टकरायलाहवीकि, स्वर्गीयबाळासाहेबठाकरे यांच्या विचारांचावारसाघेऊनएकनाथशिंदे (Eknath Shinde) ज्यापद्धतीनेशिंदेसाहेबकाम करतायत्याबद्दलसगळ्यांनाआकर्षणअसेलचना. याबद्दलकोणाचहीदुमतनाही. जाहीरपणेनाही, पण खाजगिततुम्हीकुठल्याहीलोकप्रतिनिधीलाविचारलंतरहेकुणीहीहेनाकारणारनाही. मगअशावेळीएकनेतापुढाकारघेऊनआमच्यासारख्यासामान्यकार्यकर्त्यालाजबाबदारीदेतोतरतोविचारपुढेघेऊन जायचीजिद्दआणिधमकआमच्यातआहे. हेआम्हीआमच्याकामातूनदाखवूनदिलआहे. मलाआजबोलतानाथोडाराजकीयसंयमठेवावालागतोय. पणकाहीलोकांनीउभ्याआयुष्यातएकदगडउचललानाहीतेआजआम्हालाशिकवायलालागलेतरकसंव्हायचं. अशीखोचकटोला सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

सचिन अहिरांना आम्ही काय कमी केलं?, अहिरांच्या भावाला बीएमसी दिली, मुलीला प्रभाग समिती दिली, त्यांना बेस्टचं अध्यक्षपद दिलं. रोज भेटत होतो, आता काय अहिरांसारख्यांची रोज काय आरती करायची का? असाखोचकसवालआदित्यठाकरेंनीकेला होता. याटीकेलाआतासचिनअहिरयांनीउत्तरदिलंआहे. विधानपरिषेतील उपसभापती पदासाठी अर्ज भरल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह सचिन अहिर यांनी आपली भूमिका जाहीर केली. (Sachin Ahir Join Shivsena Shinde Group)

आदित्य ठाकरे काय म्हणाले? (Aditya Thackeray On Sachin Ahir)

सचिन अहिरांना आम्ही काय कमी केलं?, अहिरांच्या भावाला बीएमसी दिली, मुलीला प्रभाग समिती दिली, त्यांना बेस्टचं अध्यक्षपद दिलं. रोज भेटत होतो, आता काय अहिरांसारख्यांची रोज काय आरती करायची?, जवळचे आणि ज्यांना सगळं काही मिळतं तेच निघून जातात. कुणाच्या जाण्याने धक्का बसत नाही. वरळी, शिवडी हा आमचा बालेकिल्ला आहे.आमचं तिकडचं काम बोलेल. तुम्हाला अजून काय हवंय, आणखी काय ओरबाडाणार?, सगळ्या परिवाराला काही ना काही दिलंय, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. तसेच वरळीतून ते (सचिन अहिर) उमेदवार असतील तर काही फरक पडणार नाही, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं. सचिन अहिरांना हाच प्रश्न आहे की, जे सोडून गेले, जे मंदिरं लुटतायत त्यांच्यासोबत तुम्ही कसे जाऊ शकता? आम्हाला खोलवर अभ्यास केल्यावर हे लक्षात आलंय की, हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.